Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीबीएमएच्या एचव्ही देसाई आय हॉस्पिटल येथे आशा व अंगणवाडी सेविकांसाठी विशेष कार्यक्रम...

पीबीएमएच्या एचव्ही देसाई आय हॉस्पिटल येथे आशा व अंगणवाडी सेविकांसाठी विशेष कार्यक्रम · तळागाळातील नेत्र आरोग्याला बळकटी देण्याचा प्रयत्न

पुणे,20 ऑगस्ट 2026 : पीबीएमएच्या एचव्ही देसाई आय हॉस्पिटल येथे नुकतेच आशा व अंगणवाडी सेविकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यामध्ये 20 समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्स – सीएचओ) सह भोर तालुक्यातील 200 आशा व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.हा उपक्रम कृषी सभापती अमोल नलावडे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आला.याप्रसंगी अमोल नलावडे यांसह तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवकर व डॉ.तिडके ,स्थानिक प्रतिनिधी किरण राऊत विशाल कोंडे, व माऊली खुटवड तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जगदाळे, उपस्थित होते.

दिवसभर आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आशा व अंगणवाडी सेविकांनी एचव्ही देसाई आय हॉस्पिटलच्या विविध विभागांना भेट देऊन कार्याची माहिती घेतली.त्यानंतर रूग्णालयातील शंकरशेठ साबळे सभागृहात त्यांच्यासाठी हॉस्पिटलच्या विविध वैद्यकीय सेवांची माहिती,सामान्यपणे आढळणारे विविध नेत्र आजार,याची प्राथमिक लक्षणे याबाबत नेत्रतज्ञांनी सादरीकरण केले.

याप्रसंगी पीबीएमएच्या एचव्ही देसाई आय हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक परवेझ बिलिमोरिया,कार्यकारी वैद्यकीय संचालक (नेटवर्क) डॉ.कुलदीप डोळे,युनिट व लॅसिक विभागप्रमुख डॉ.वर्षा पुराणिक,प्रकल्प संचालक डॉ.प्रविण नरवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमानंतर आशा व अंगणवाडी सेविकांसाठी मोफत नेत्र तपासणी व गरज असलेल्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आला.

आशा व अंगणवाडी सेविका या समुदाय आणि आरोग्य यंत्रणेमधील एक महत्त्वाचा दुवा असतात.विशेष करून ग्रामीण भागातील कुटुंबियांसोबत त्यांचा संवाद असतो.त्यामुळे आरोग्याच्या कुठल्याही समस्या ओळखून योग्य वेळी निदान व उपचार मिळवून देण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतात.याआधी एचव्ही देसाई आय हॉस्पिटल येथे वेल्हे तालुक्यातील आशा व अंगणवाडी सेविकांसाठी अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पीबीएमएच्या एचव्ही देसाई आय हॉस्पिटलचे कार्यकारी वैद्यकीय संचालक (नेटवर्क) डॉ.कुलदीप डोळे म्हणाले की, विशेष करून ग्रामीण व निमशहरी भागातील लोकांमध्ये नेत्र आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्यामध्ये आणि नेत्र समस्या असलेल्या लोकांमध्ये लक्षणे ओळखून त्यांना योग्य वेळेत उपचार मिळवून देण्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे ठरतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments