Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedसेव्ह दी फूट’ हे ‘एआय’ अॅप सादर मधुमेहामुळे पाय गमावण्याची भीती...

सेव्ह दी फूट’ हे ‘एआय’ अॅप सादर मधुमेहामुळे पाय गमावण्याची भीती आता होणार कमी

पुणे : मधुमेहाच्या रुग्णांच्या पायांच्या जखमांचे (फूट अल्सर) व्यवस्थापन अधिक वेगाने आणि प्रभावीपणे करण्यासाठी ‘सेव्ह दी फूट’ हे नवे आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर (एआय) आधारित मोबाइल अॅप शनिवारी (१४ मार्च) आज पुण्यात पार पडलेल्या १०व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेत सादर करण्यात आले. रुग्णांचे पाय कापले जाण्यापासून वाचवणे, हा या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश आहे.

 

 

मधुमेहामुळे पायाला होणाऱ्या जखमा ही एक गंभीर समस्या आहे. यावर योग्य वेळी उपचार झाले नाहीत, तर संसर्ग वाढून पाय कापण्याची वेळ येऊ शकते. ‘सेव्ह दी फूट’ हे अॅप स्मार्टफोनच्या माध्यमातून डॉक्टरांना आणि रुग्णांना या समस्येवर स्मार्ट आणि सोपा उपाय उपलब्ध करते.

 

‘सेव्ह दी फूट’ कसे मदत करते?

हे अॅप डॉक्टरांना निर्णय घेण्यासाठी मदत करणारे महत्त्वाचे साधन म्हणून काम करते. ‘एआय’ पॉवर्ड ‘इमेज कॅप्चरिंग’च्या मदतीने हे अॅप पायाच्या जखमेच्या फोटोंचे विश्लेषण करते. त्यानंतर जखमेचा आकार आणि तिची गंभीरता तत्काळ ठरवते. या जलद विश्लेषणामुळे डॉक्टरांना उपचारांबाबत तातडीने आणि अचूक निर्णय घेणे सोपे होते; जे जखम लवकर भरून येण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय हे अॅप ‘एसमॉलॉल हायड्रोक्लोराइड’सारख्या प्रगत उपचारांशी सुसंगत आहे. देशात उपलब्ध असलेले हे आधुनिक उपचार जखम पूर्णपणे बरी करण्यासाठी प्रभावी ठरतात. हे उपचार जखम भरून येण्याच्या तिन्ही महत्त्वाच्या टप्प्यांवर (सूज कमी करणे, पेशींची वाढ आणि त्वचेची पुनर्निर्मिती) काम करतात आणि जखम पुन्हा उद्भवण्यापासून रोखतात.

 

‘सेव्ह दी फूट’ची मुख्य वैशिष्ट्ये

१) ‘एआय इमेज’ विश्लेषण : जखमेच्या फोटोंचे झटपट विश्लेषण करून तिचे मूल्यांकन करते.

२) हीलिंग ट्रॅकर : जखम काळानुरूप कशी भरून येते, हे आलेखाच्या (Charts) माध्यमातून पाहता येते.

३) वाउंड ग्रेडिंग : जखमेची तीव्रता समजून घेण्यासाठी विशेष ग्रेडिंग प्रणालीचा वापर.

४) रुग्णाचे रेकॉर्ड : रुग्णाच्या जखमेचा आणि उपचारांचा सुरक्षित इतिहास जतन केला जातो.

५) सुरक्षित क्लाउड स्टोरेज : रुग्णांची सर्व माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि खासगी राहील, याची खात्री देते.

 

अॅप कुठे उपलब्ध?

‘सेव्ह दी फूट’ हे अॅप आता ‘गुगल प्ले स्टोअर’ (अँड्रॉइड) आणि ‘अॅपल अॅप स्टोअर’वर (आयओएस) डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments