Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedगौ टेक ग्लोबल समिट व एक्स्पोचे भूमिपूजन संपन्न कृषी महाविद्यालय मैदानावर २०...

गौ टेक ग्लोबल समिट व एक्स्पोचे भूमिपूजन संपन्न कृषी महाविद्यालय मैदानावर २० ते २३ मार्चदरम्यान आयोजन; तब्बल ५ लाख अभ्यागत, ३०० पेक्षा अधिक स्टॉल्स व विविध उपक्रम ; विनामूल्य प्रवेश

पुणे : आंतरराष्ट्रीय संस्था ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज (जीसीसीआय) यांच्या वतीने, महाराष्ट्र गो सेवा आयोग आणि आर आर काबेल यांच्या सहकार्याने “गौ टेक २०२६” या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद व प्रदर्शनाचे आयोजन दि. २० ते २३ मार्च २०२६ दरम्यान कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर, पुणे येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा भूमिपूजन सोहळा दि. १५ मार्च रोजी संपन्न झाला. गौ टेक २०२६ हे भारतीय संस्कृती, परंपरा, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा सशक्त संगम आहे.

 

या सोहळ्यास राज्यसभेच्या खासदार डॉ.मेधा कुलकर्णी, प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, जीसीसीआय चे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री तसेच राष्ट्रीय कामधेनू आयोग चे माजी अध्यक्ष डॉ.वल्लभभाई कथिरिया, तसेच महाराष्ट्र गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष व गौ टेक २०२६ चे आयोजन अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की पुणे हे विद्येचे माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब म्हणून ओळखले जाते. आता पुण्याला गोसेवा व गौ-आधारित उपक्रमांचे केंद्र म्हणूनही ओळख मिळायला हवी. गोमातेच्या संकल्पनेमागे व्यापक असा दृष्टिकोन असून त्याच्याशी संबंधित अनेक आयाम आहेत. या सर्व बाबी व गौ-आधारित उत्पादने सामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, आणि ते गौ टेक २०२६मधून साध्य होईल, असे त्यांनी सांगितले.

 

डॉ. वल्लभभाई कथिरिया म्हणाले की, गौ-आधारित उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या आयोजनामागील उद्देश आहे. हे केवळ एक प्रदर्शन नसून गौ-आधारित अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून भारताला आत्मनिर्भर व संस्कारित बनविण्याच्या दिशेने एक व्यापक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभियान आहे. गौ टेक २०२६ मध्ये धोरणकर्ते, समाजसेवक, शास्त्रज्ञ, उद्योगपती, स्टार्ट-अप्स, गुंतवणूकदार, शेतकरी, गौशाळा, विद्यापीठे, संत समाज, महिला व युवक देश-विदेशातून मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

 

शेखर मुंदडा यांनी सांगितले की, गौ टेक २०२६ मध्ये ३०० पेक्षा अधिक स्टॉल्स, १० पेक्षा अधिक विषयाधारित परिसंवाद, विशेष सत्रे, B2B बैठका तसेच परदेशी प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. या चार दिवसीय कार्यक्रमाला ५ लाखांहून अधिक अभ्यागत येण्याची अपेक्षा आहे.

 

प्रदर्शनामध्ये सेंद्रिय खत व बायो-फर्टिलायझर्स, दूध व मूल्यवर्धित दुग्ध उत्पादने, गौमूत्र व गोबरावर आधारित उत्पादने, नैसर्गिक शेती, पशुवैद्यकीय महाविद्यालये व विद्यापीठे, सीमेन प्रयोगशाळा, सेक्स-सॉर्टेड सीमेन व एम्ब्रियो ट्रान्सफर तंत्रज्ञान, सौर व बायो-एनर्जी, चारा व बियाणे उद्योग, चारागाह विकास यंत्रसामग्री, शासकीय व खासगी बँका, सहकारी संस्था, दुग्ध संघ व फेडरेशन, विविध राज्यांचे गौ सेवा आयोग, अनिमल फूड प्रोसेसिंग युनिट्स, इनोव्हेटिव्ह स्टार्ट-अप्स, संशोधन व विकासावर आधारित गौ-उत्पादने, भारतीय देशी गौ-नस्लांचे लाईव्ह प्रदर्शन, तसेच नॅचरोपथी, आयुर्वेद व पंचगव्य आधारित उपचार पद्धतींशी संबंधित स्टॉल्स सहभागी होणार आहेत.

 

डॉ. वल्लभभाई कथिरिया यांच्या मार्गदर्शनाखाली या आयोजनात शेखर मुंदडा, रमेश घेटीया, हंसराज गजेरा, अमिताभ भटनागर (जनरल सेक्रेटरी, जीसीसीआय), मित्तल खेतानी (जनरल सेक्रेटरी, जीसीसीआय), पुरीश कुमार (जनरल सेक्रेटरी, जीसीसीआय), गिरीश शाह, डॉ. नितीन मार्कंडेय, संजय भोसले, उद्धव नेरकर, सुनील सूर्यवंशी, सनत कुमार गुप्ता, दीपक भगत, मनीष वर्मा, परेश शाह तसेच इतर अनेकांसह डॉ. दिलीप कुलकर्णी, मंगल अकोले, महेश लुहार, विनायक बोरोलें पाटील, कौस्तुभ देशपांडे, मल्हार चणीयारा, रमेश ओसवाल, भाग्यश्री चौंडे, अश्विनी पाटील, डॉ. देशमुख, राजेंद्र चौहान, दिलीप काले, सुरेश धर्मावत आणि मगराज राठी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या चार दिवसीय कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्या

त आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments