पिंपरी,
आमदार अण्णासाहेब बनसोडे व शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाने बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालय व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या कार्याध्यक्ष मीरा कांबळे यांच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. गोकुळजी गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव सन्माननीय एल.एस.कांबळे आवर्जून उपस्थित होते..
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय संघटनेच्या कार्याध्यक्ष मीरा कांबळे,यांनी यशस्वी पणे केले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष संजय औसरमल राष्ट्रवादी बचत गट महासंघाच्या शहराध्यक्ष ज्योतीताई गोफणे, रजनी गोसावी शिल्पा खुने, योगेश्वरी जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. बाबाजी शिंदे आवर्जून उपस्थित होते.
संस्थेचे सचिव लहू कांबळे सर यांनी कार्यक्रमाच्या वेळी आधुनिक काळातील युवक महिला पुढील आव्हाने विषद केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. बाबाजी शिंदे यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे विशेष बाब म्हणजे प्रमुख अतिथी ….. नामवंत प्रसिद्ध व्याख्याते प्रा. श्री विवेक गोविंदराव गुरव यांनी संपूर्ण महिलांचा जीवनपट व महिलांमध्ये असणारे सदगुण… संस्कृती अनेक दाखले देऊन उत्कृष्ट असं महिलांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या *मीरा कांबळे* यांनी जागतिक महिला दिनानिमित्त प्रमुख पाहुणे अतिथी व्याख्याते सचिव व मुख्याध्यापक यांना राष्ट्रवादी संघटनेचे सन्मान चिन्ह ट्रॉफी बहाल करून स्वागत केले विद्यालयासाठी *टेबल फॅन बक्षीस* दिला.. व विद्यालयातील सर्व महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त विद्यालयातील *सर्व शिक्षिकांचा सत्कार* करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाती पाटील, , सुजाता जोगदंड, सुभाष कावळे, रुपाली पवार, संदीप बोर्गे, पुनम तारख, मिलिंद चोरगे, उमेश माने, कोमल गायकवाड, किशोर बडे संगीता शिंदे, दैवशाला चोले, मोहिनी चव्हाण , शिल्पा कासार, अडपद मॅडम, जयश्री महानवर, अमोल सूर्यवंशी, प्रमोद रायकर, धुडकू कुवर, नाना शिंदे, नारायण हिरगुडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख सदाशिव झेंडे यांनी केले व आभार जितेंद्र सूर्यवंशी यांनी मानले. जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील सर्व *शिक्षिकांचा व पालकांचा* श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला… सर्व विद्यार्थ्यांना *खाऊ वाटप* करून वंदे मातरम् राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली….
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात
RELATED ARTICLES


