Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिलांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन*  

महिलांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन*  

 

 

पुणे, दि. 16 (जि.मा.का.): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत यशस्वी ॲकेडमी फॉर स्किलींग यशस्वी भवन चिंचवड पुणे यांच्या सयुक्त विद्यमानाने 18 मार्च 2026 रोजी यशस्वी ॲकेडमी फॉर स्किलींग यशस्वी भवन 169, 1-A, चिंचवड-आकुर्डि लिंक रोड, एलप्रो इंटरनॅशनलच्या समोर, विजय नगर, चिंचवड, पुणे येथे सकाळी 10 वाजता महिलांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील विविध उद्योजकांनी त्यांच्या सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून 200 पेक्षा जास्त रिक्तपदे भरण्यात येणार आहे. ही सर्व रिक्तपदे किमान 10 वी, 12 वी, डिप्लोमा, बी,ई, पदवीधर, मशिन ऑपरेटिंग, प्रोडक्शन, ट्रेनी अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी तसेच अप्रेंटिस योजनेअंतर्गतही ट्रेनी पदांसाठी असून पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

 

इच्छुक महिला उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहिती करुन घेण्यासोबतच अर्ज करण्याकरिता www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. खाजगी क्षेत्रातील विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी अधिकाधिक नोकरी इच्छुक रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून, आपला सहभाग नोंदवावा व या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा.

 

उमेदवारांनी मुलाखतीस येताना सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, आवश्यकतेनुसार अर्जाच्या प्रती सोबत आणाव्यात, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, 481 रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे-411011 येथे प्रत्यक्ष अथवा 020-26133606 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पुणे यांनी केले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments