Tuesday, October 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन*

स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन*

 

 

पुणे, दि.१८: स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी-३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्री क्षेत्र वढू बु. येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जावून दर्शन घेतले. तसेच श्री क्षेत्र तुळापूर येथील बलिदानस्थळी जावून अभिवादन केले.

 

यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, बापुसाहेब पठारे, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्य, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उप विभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, वढू.बु. चे सरपंच कृष्णा आरगडे, तुळापुरच्या प्रशासक संरपच ॲड. गुंफा इंगळे आदी उपस्थित होते.

 

यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुळापूर येथे आयोजित मुकज्योत पदयात्रेत गावकऱ्यांसोबत सहभागी झाल्या. तुळापूर येथील संगमस्थळी जावून संगमेश्वराचे दर्शन घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments