Tuesday, October 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुलखावेगळ्या स्त्रियांचे  " जिचं तिचं आकाश " प्रकाशित 

मुलखावेगळ्या स्त्रियांचे  ” जिचं तिचं आकाश ” प्रकाशित 

 

अमेरिकेत आणि भारतात

विविध क्षेत्रात मुलखावेगळी कामगिरी करीत असलेल्या स्त्रियांच्या प्रेरणादायी जीवन कथा असणार्‍या अमेरिका स्थित लेखिका चित्रा मेहेंदळे ह्यांच्या ” जिचं तिचं आकाश ” ह्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच विले पार्ले ( पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या सभागृहात

शानदारपणे झाले.

 

या प्रकाशन सोहोळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ न्यायमूर्ती श्रीमती बागेश्री पारख,अभिनेत्री सुप्रिया सचिन पिळगावकर, ग्रंथालीचे विश्वस्त श्री सुदेश हिंगलासपूरकर, नगरसेविका श्रीमती अंजली सामंत उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अभिनेत्री रजनी वेलणकर ह्यांनी भूषविले. सौ अलका भुजबळ ह्यांनी बहारदारपणे सूत्रसंचालन करून कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली.

 

ह्यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांची समयोचित भाषणे झाली. तर श्रीमती रजनी

वेलणकर ह्यांनी पुस्तकातील काही कथा नायिकांच्या जीवनाचा संघर्ष उलगडून सांगताना, अत्यंत प्रेरणादायी असे हे पुस्तक आजच्या युवक युवतींनी वाचलेच पाहिजे असे, आवर्जून सांगितले.

 

प्रारंभी लेखिका चित्रा मेहेंदळे यांनी सर्वांचे स्वागत करून पुस्तकामागील प्रेरणा, पुस्तकाची जडणघडण ह्याबद्दल विस्ताराने सांगितले. आभार प्रदर्शन श्री देवेंद्र भुजबळ यांनी केले.

 

या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर आणि साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर

उठून दिसणारे ह्या पुस्तकाचे वैशिष्टय़ म्हणजे सर्व कथा नायिका,लेखिका, प्रकाशिका, कार्यक्रमाच्या अध्यक्षा ह्या सर्व महिलाच आहेत. ह्या पुस्तकाची निर्मिती ग्रंथाली ने केली असून न्यूज स्टोरी टुडेने प्रकाशन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments