Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या शहीदी समागमानिमित्त...

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या शहीदी समागमानिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी सुयोग्य नियोजन केल्याबद्दल महापौर रवि लांडगे यांचा करण्यात आला सन्मान

पिंपरी, दि. २३ मार्च २०२६ : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. त्याबद्दल पिंपरी गुरुद्वारा व देहूरोड गुरुद्वारा यांच्या वतीने महापौर रवि लांडगे यांचा सन्मान करण्यात आला.

 

यावेळी सुरिंदर सिंग, गुरुविंदर सिंग, गुरुचरण सिंग, लखविंदर सिंग, गोविंद सिंह यांच्यासह पिंपरी गुरुद्वारा व देहूरोड गुरुद्वारा चे पदाधिकारी, नागरिक तसेच कार्यक्रमाच्या आयोजनात योगदान देणारे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचे औचित्य साधून २८ फेब्रुवारी व शनिवार १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई येथील खारघर परिसरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समागमास पिंपरी चिंचवड शहरातील विविध समाजघटकांतील भाविक मोठ्या संख्येने गेले होते. पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या भाविकांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वाहतूक नियोजन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, वैद्यकीय सहाय्य तसेच आवश्यक समन्वयात्मक उपाययोजना करण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी महापालिकेच्या विविध विभागांना सूचना दिल्या होत्या. या नियोजनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत महापौर रवि लांडगे यांचा आज सन्मान करण्यात आला.

 

यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, ‘श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांनी मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान हे सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा पवित्र समागमासाठी जाणाऱ्या भाविकांना सुरक्षित व सुलभ प्रवास अनुभव मिळावा, ही महापालिकेची जबाबदारी आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून हे नियोजन यशस्वीरीत्या पार पडले, याचा आनंद

आहे.’

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments