Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय वारसा, नव्या रुपात: आदित्य बिर्ला ज्वेलरीचा ब्रँड इंद्रियाकडून अमित अग्रवाल यांच्यासोबत...

भारतीय वारसा, नव्या रुपात: आदित्य बिर्ला ज्वेलरीचा ब्रँड इंद्रियाकडून अमित अग्रवाल यांच्यासोबत सहयोगाने लक्मे फॅशन वीक x एफडीसीआयमध्ये ‘ओरिझॉन’ सादर

मुंबई, 24 मार्च २०२६: इंद्रिया या आदित्‍य बिर्ला ज्‍वेलरीच्‍या ब्रँडने लक्मे फॅशन वीक x एफडीसीआयमध्ये ‘ओरिझॉन’ सादर करून रॅम्प उजळून टाकला. भारताच्या अत्यंत प्रभावशाली फॅशन मंचावर पोल्कीच्या आधुनिक कारागिरीला केंद्रस्थानी ठेवणारा हा विशेष शो होता. इंद्रियाने पोल्की आणि हिऱ्यांच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान केला, ज्याला अमित अग्रवाल यांचे सर्वोत्तम बनारसी विणकाम आणि काचकामाची जोड देण्यात आली होती; यातून आधुनिक भारतीय अभिव्यक्तीचे नवीन रूप सादर झाले. केवळ मर्यादित राहण्यासाठी नाही तर सक्षम बनवण्याचा आणि भारतातील आधुनिक महिलेला आपल्या मुळांशी संलग्‍न करत आपला वारसा अभिमानाने पुढे नेण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने हा शो डिझाइन करण्‍यात आला होता. रॅम्पवर ब्रँडने प्रकाशाचा खेळ, आकर्षक रत्‍नांच्‍या जोड्या आणि हिऱ्यांच्या अतुलनीय तेजाद्वारे पोल्कीला सादर केले, यातून पारंपारिक कारागिरीचे रूपांतर आधुनिक आणि परिधान करण्यायोग्य उच्‍च फॅशन श्रेणीमध्‍ये करण्यात आले.

पारंपारिक हस्तकला आणि आधुनिक फॅशन यांचे संयोजन दाखवणारी व मंत्रमुग्ध करणारी संध्याकाळ

प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी हिने या शोची शोस्टॉपर म्हणून धुरा सांभाळली. तिने परिधान केलेले इंद्रियाचे आकर्षक दागिने आणि अमित अग्रवाल यांचे शिल्‍पाकृती फॅशनेबल पोशाख यांमुळे ओरिझॉनला खऱ्या अर्थाने संजीवनी मिळाली. दिशाच्या उपस्थितीने भारतीय वारशाच्या प्रभावी आणि आधुनिक रूपाचे दर्शन घडवले, जेथे परंपरा आणि आधुनिकता यांचा तेजस्वी संगम पाहायला मिळाला. रॅम्पवरील हे सादरीकरण प्रकाश आणि रचनेच्या दृश्य कथेसारखे उलगडत गेले. याची सुरुवात हिऱ्यांच्या नाजूक दागिन्यांनी झाली, ज्यांनी प्रकाशाच्या पहिल्या किरणांचा भास निर्माण केला. त्यानंतर हळूहळू त्याचे रूपांतर भव्य पोल्की आणि सोन्याच्या दागिन्यांमध्ये झाले, जेथे पारंपारिक आकारांना आधुनिक डिझाइनची जोड देण्‍यात आली. प्रत्येक डिझाइनमध्ये प्रकाशाचा खेळ अतिशय गतिमान वाटत होता, तरीही हे दागिने भारताच्या प्राचीन हस्तकलेशी घट्ट जोडलेले होते. वारसा लाभलेली परंपरा प्रभावी आधुनिक ओळखीमध्ये विकसित होऊ शकते, हेच यातून सिद्ध झाले. संपूर्ण शोमध्ये कपडे आणि दागिने जणू एकमेकांशी संवाद साधत होते. ओरिझॉन हे केवळ दुरून पाहण्याचे प्रदर्शन नव्हते, तर रॅम्पवर अवतरलेला अनुभव होता, जो प्रत्यक्ष अनुभवता येईल अशा स्वरूपात सादर झाला.

आदित्‍य बिर्ला ज्‍वेलरीचा ब्रँड इंद्रियाचे सीईओ श्री. संदीप कोहली म्‍हणाले, ”इंद्रिया डिझाइन उत्‍कृष्टता आणि आधुनिक हेतूसह नव्या युगासाठी पोल्की आणि हिऱ्यांच्या दागिन्यांना नवीन रूप देत आहे, हे दाखवण्‍याकरिता लक्मे फॅशन वीक प्रभावी व्यासपीठ ठरले. डिझाइनमधील नाविन्यतेमुळे अधिक उजळून निघालेल्या आमच्या दागिन्यांनी रॅम्पवर वेगळीच चमक पसरवली. हा एक असा प्रवास होता, जेथे वारसा हे कोणतेही बंधन नसून सक्षमीकरणाचे साधन आहे, जे परंपरेला अधिक प्रगल्भ होण्याची संधी देते. अमित अग्रवाल यांच्या शिल्‍पाकृती वेशभूषेसोबतच्या संवादातून ही दागिन्यांची कथा अधिक प्रभावीपणे सादर करण्‍यात आली. अपसायकल केलेले बनारसी विणकाम आणि काचकामाचा वापर करून तयार केलेली ही वेशभूषा या शोचे खास आकर्षण ठरली. अमित अग्रवाल यांच्यासोबत सहयोगाने आम्ही भारतीय हस्तकलेचा नवीन आविष्कार सादर केला, जो आधुनिक व सक्षम वाटतो; विशेषतः आपला वारसा अभिमानाने पुढे घेऊन जाणाऱ्या महिलांसाठी डिझाइन करण्‍यात आला.”

 

आपल्‍या वेशभूषेबबात मत व्‍यक्त करत अमित अग्रवाल म्‍हणाले, ”लॅक्‍मे फॅशन वीक x एफडीसीआयमध्ये ओरिझॉन साकारणे म्हणजे परिवर्तनाचा क्षण टिपण्यासारखे होते. उत्क्रांतीचा प्रवास म्हणून संकल्पित करण्‍यात आलेल्‍या या संग्रहाने रॅम्पवर उतरताच दाखवून दिले की, भावना, नाविन्यता आणि सहयोग यांमधून कला विकसित होत राहते. आदित्य बिर्ला ज्वेलरीचा ब्रँड इंद्रियासोबत काम केल्यामुळे आम्हाला वेशभूषा आणि दागिने यांच्यात अद्वितीय संयोजन निर्माण करता आले, येथे दोन्ही घटकांनी परिवर्तनाची संयुक्त गाथा मांडण्यासाठी एकमेकांना पूरक साथ दिली. दोन्ही ब्रँड्समधील हा ताळमेळ अचूकता, कारागिरी आणि आधुनिक आकर्षण यांनी समृद्ध आहे.”

 

ओरिझॉनच्या माध्यमातून इंद्रिया आणि अमित अग्रवाल यांनी भारतीय वारशाला शक्तिशाली आणि समकालीन मानवंदना अर्पण केली, जेथे रॅम्‍पवर कला, भावना व नाविन्यतेचे संयोजन पाहायला मिळाले आणि परंपरेने स्वतःला नवीन रूपात सादर करण्‍यासाठी नवीन वळण

घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments