Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री राम मंदिर अयोध्येचे मुख्य वास्तुरचनाकार भारत गौरव चंद्रकांत सोमपुरा यांना पुण्यधाम...

श्री राम मंदिर अयोध्येचे मुख्य वास्तुरचनाकार भारत गौरव चंद्रकांत सोमपुरा यांना पुण्यधाम आश्रमाचा ‘पुण्यधाम ह्युमनिटेरियन सर्व्हिस’ पुरस्कार प्रदान

‘पुण्यधाम ह्युमनिटेरियन सर्व्हिस’ पुरस्कार भारत गौरव चंद्रकांत सोमपुरा (श्री राम मंदिर अयोध्येचे मुख्य वास्तुरचनाकार) यांना ५ मार्च २०२४ रोजी एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. ही तारीख पुण्यधाम आश्रमासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण ५ मार्च हा त्यांचे अध्यक्षा मा कृष्ण कश्यप यांचा वाढदिवस आहे. हा दिवस पुण्यधाम आश्रम दिन म्हणून साजरा केला जातो. हे या उत्सवाचे सलग पाचवे वर्ष आहे.
चंद्रकांत सोमपुरा या ख्यातनाम व्यक्तिमत्त्वाची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. त्यांनी आपल्या निःस्वार्थ सेवेद्वारे समाजावर मोठा ठसा उमटवला आहे.
पद्मभूषण डॉ. विजय भाटकर, निखिल सोमपुरा, श्री. व सौ जी. बी. देगलुरकर (ख्यातनाम पुरातत्त्व संशोधक) शशिकांत पागे (विश्वस्त), सदानंद शेट्टी, माताजी तसेच इतर अनेक विश्वस्त या निमित्ताने उपस्थित होते.
श्री. रमेश ग्रोवर यांनी उपस्थित असलेल्या मान्यवरांची ओळख करून दिली आणि त्यानंतर त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. त्यानिमित्ताने त्यांच्या योगदानाचा गौरव करून त्यांना पुरस्कृत करण्यात आले.
चंद्रकांत सोमपुरा यांचे पुत्र निखिल सोमपुरा यांनी आपल्या वडिलांच्या वतीने अत्यंत आनंदाने हा पुरस्कार स्वीकारला. ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्यांना १ लाख रूपयांचा धनादेश, एक शाल, श्रीफळ, फुले, मानपत्र आणि एक सुंदर मानचिन्ह देण्यात आले.
या वेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपली मते व्यक्त करून पुण्यधाम आणि माताजींचे आश्रमात येण्याची संधी देऊन आपला गौरव केल्याबद्दल आभार मानले. माताजींनी या उपस्थितांना मार्गदर्शन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि उपदेशाने सर्वांना पवित्र केले.
या कार्यक्रमाचे नियोजन रमेश ग्रोवर यांनी अचूकपणे केले. या खास दिवसाचा शेवट सर्वांना चविष्ट आणि सुग्रास प्रसाद देऊन करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments