Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorized७५० नृत्यांगनांची 'वंदे मातरम्'ला मानवंदना* *कोथरुडमध्ये रंगणार शास्त्रीय...

७५० नृत्यांगनांची ‘वंदे मातरम्’ला मानवंदना* *कोथरुडमध्ये रंगणार शास्त्रीय नृत्याचा महाकुंभ!*

 

 

*मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ॲड. आशिष शेलार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती*

 

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांसाठी मंत्र ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताच्या निर्मितीला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधून पुण्यातील कोथरुड भागात एक अभूतपूर्व सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. ७५० पेक्षा जास्त शास्त्रीय नृत्यांगना एकत्रितपणे ‘वंदे मातरम्’वर आपली कला सादर करून या गीताला अनोखी मानवंदना देणार आहेत.

 

प्रख्यात नृत्यगुरू रोहिणी भाटे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी कोथरुडमध्ये शास्त्रीय नृत्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा या महोत्सवाचे चौथे वर्ष असून, २८ आणि २९ मार्च रोजी कोथरुडमधील ‘शुभारंभ लॉन्स’ येथे हा सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग, युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवाचे संयोजन नगरसेवक पुनीत जोशी आणि अजय धोंगडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे, ख्यातनाम नृत्यगुरू शमा भाटे, मनीषा साठे आणि सुचेता चापेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ७५० हून अधिक नृत्यांगना एकाच वेळी मंचावर अवतरणार आहेत. हा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माधुरीताई मिसाळ आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

यापूर्वीच्या तीन पर्वांमध्ये रमा वैद्यनाथन, वस्वती मिश्रा आणि प्रीती पटेल यांसारख्या जागतिक कीर्तीच्या कलाकारांनी आपल्या नृत्याने पुणेकरांना मंत्रमुग्ध केले होते. यंदाचे वर्ष हे ‘वंदे मातरम्’च्या दीडशे वर्षांच्या प्रवासाला समर्पित असल्याने, हा महोत्सव केवळ एक कार्यक्रम न राहता तो राष्ट्रभक्ती आणि कलेचा एक सुंदर संगम ठरणार आहे.

 

“भारतीय संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा महोत्सव एक उत्तम माध्यम आहे. जास्तीत जास्त पुणेकरांनी या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घ्यावा,” असे आवाहन संयोजक पुनीत जोशी आणि अजय धोंगडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments