Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedलोकस्वातंत्र्य हा समाज कल्याणाचं मंथन सिध्द करणारा पत्रकार महासंघ... डॉ.हेमांगी सोळंकी

लोकस्वातंत्र्य हा समाज कल्याणाचं मंथन सिध्द करणारा पत्रकार महासंघ… डॉ.हेमांगी सोळंकी

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ १२ वा मुंबई विचारमंथन मेळावा संपन्न. लेखक,दिग्दर्शक,अभिनेत्री व समाजसेविकांना विश्वशक्ती गौरव पुरस्कार,सहकारी सहकलाकारांचे स्वागत तथा महिलांचा साडी चोळी,सन्मानपत्रांनी गौरव

दिवंगत गायिका आशा भोसले व शहिद जवान,शेतकरी व विविध बळींना श्रध्दांजली

मुंबई/अकोला- सामाजिक कल्याण कार्याचं चिंतन आणि त्यासाठी कृतीशील उपक्रम जिथे राबविले जातात तेच खरं विचारमंथन असतं, हे सिध्द करणारी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही संघटना आहे.आजच्या समाजातील महिला आणि पुरूष सुध्दा असाध्य रोगाने पिडीत होऊन मानसिक तणावात वावरत आहेत.समाजातील रोगमुक्तीचं काम जोपर्यंत मोठ्या प्रमाणात होणार नाही तोपर्यंत सामाजिक विकास नाही.यासाठी “माझं आरोग्य माझी पहिली जबाबदारी” ही समज अंगिकारून तप-सेवा- सुमिरण समजून घेऊन आचरण करावे.असे महत्वपूर्ण मार्गदर्शन मानस योग साधना प्रशिक्षक डॉ.हेमांगी भरत सोळंकी यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा कोकण.मु़ंबई विभागाचा १२ वा विचारमंथन मेळावा, लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव या राज्यस्तरीय महिला सन्मान पुरस्कारांचे वितरण आणि महिला सन्मान समारंभ विदर्भ वैभव मंदिर,दादर येथे संपन्न झाला.त्यावेळी अध्यक्षिय मनोगतातून त्या बोलत होत्या.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लेखक दिग्दर्शक नवीन अग्रवाल,प्रेरणा अग्रवाल ह्या प्रमुख अतिथी म्हणून, तर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,प्रयास फाउंडेशनचे चंद्रकांत खेडगीकर (अंबरनाथ) लोकस्वातंत्र्य महाराष्ट्र संघटन प्रमुख अरविंदराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,कर्मयोगी संत गाडगेबाबा व महापुरूषांना वंदन,अभिवादन करण्यात आले.गायिका स्व.आशा भोसले,शहिद जवान,आत्महत्त्याग्रस्त शेतकरी,महिला बळी,दिवंगत पत्रकार तथा अपघात,आपत्तीग्रस्तांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी “जय जय स्वामी समर्थ” फेम मालिका अभिनेत्री अपूर्वा देशमुख,लेखक दिग्दर्शक प्रेरणा व नवीन अग्रवाल,पत्रकार सुषमा ढोले- ठाकूर व शेख जबीना यांना “लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव” या राज्यस्तरीय महिला सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले, सहकलाकारांचे स्वागत तथा ३० महिलांचा साडी चोळी आणि सन्मानपत्रांनी गौरव करण्यात आला.प्रेरणा अग्रवाल यांनी पत्रकारिता चौथा आणि नाट्यशास्त्र हा पाचवा स्तंभ असल्याचे सांगून‌ नारी सन्मान म्हणून एक हिंदी रचना सादर केली. पत्रकार आणि समाज कल्याणासोबतच विविध क्षेत्राला स्पर्श करून या महिला सन्मानासह लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सामाजिक कार्यक्रम म्हणजे समतावादाच्या संवर्धनासाठी उपयुक्त असे अभिनव उपक्रम असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित अतिथींनी याप्रसंगी व्यक्त केल्या.
लेखिका,दिग्ददर्शक,निर्माती प्रेरणा अग्रवाल यांनी “शबरी के राम”या नाटकाचे व “मॉं कहानी संग्रह ही त्यांची पुस्तके संघटना व्यक्त संजय एम.देशमुख यांना भेट दिली.

या कार्यक्रमाला लोकस्वातंत्र्य महाराष्ट्र संघटन प्रमुख,पंजाबराव देशमुख, सौ. मिनाक्षी देशमुख, डॉ.भरत सोळंकी (योग परिवार) मंत्रालयीन समन्वयक तथा राज्य पदाधिकारी रफिक मुलानी,सोमया मुलानी,कोकण प्रभारी जगदिशप्रसाद करोतिया,सौ.विजयावती करोतिया,संपत उजाला,(बोईसर)विनोद चाळके,कमलेश कुबल,(सांताक्रुझ) नुरूद्दीन सिद्दीकी, (नांदेड)नितीन शर्मा,देव शर्मा,केशव भारद्वाज,,इंद्रनिल अधिकारी,जय प्रताप सिंग,(सहकलाकार) विकास भोसले,कमलेश कुबल,संतोष बामणे, मंगल शिंदे,सौ.प्रतिक्षा व तुषार तल्हार (सि.ए.) गजानन वाघ,जबीना शेख,भानु जाधव,भप्पी जाधव,सौ.तक्षशिला व तेजराव तेलंग (कल्याण) सुहास मोरे, कमलेश कुबल व अनेकांची उपस्थिती होती.
संचलन व आभारप्रदर्शन महिला आघाडी प्रमुख सुषमा ढोले- ठाकूर यांनी केले.
===================================

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments