Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedबुद्धिमत्तेसोबत कठोर परिश्रमही यशासाठी तितकेच आवश्यक” : सनी निम्हण 

बुद्धिमत्तेसोबत कठोर परिश्रमही यशासाठी तितकेच आवश्यक” : सनी निम्हण 

 

 

खडकीच्या सृष्टी मित्तलने सीबीएससी बोर्डात 96.6% गुण मिळवत यश संपादन केल्याबद्दल केला सन्मान

 

पुणे: खडकी परिसरातील सुकन्या सृष्टी मित्तल हिने आपल्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर CBSE बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९६.६ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. औंध-बोपोडी प्रभागातील खडकी येथील रहिवासी असलेल्या सृष्टीने आपल्या परिश्रमातून विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्याबद्दल नगरसेवक सनी निम्हण यांनी तिचा सन्मान केला.

 

 

सृष्टीच्या या यशाबद्दल सनी निम्हण यांच्या “झुंज” निवासस्थानी तिची भेट घेऊन मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सनी निम्हण यांनी सांगितले की, केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही, तर त्यासोबत कठोर परिश्रम आणि यशाची प्रबळ इच्छा असणे आवश्यक असते. सृष्टीने हे आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.

 

तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत सृष्टी मित्तल हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments