Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहापालिकेच्या वतीने क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

महापालिकेच्या वतीने क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

पिंपरी, दि.१८ एप्रिल २०२६ :– थोर क्रांतिकारक तसेच हुतात्मांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते, चिंचवड गावातील चापेकर बंधु अशाच थोर हुतात्मांपैकी होते. क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर आणि त्यांचे बंधू वासुदेव व बाळकृष्ण यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा मिळाली आणि देशभक्तीची ज्योत अधिक प्रखर झाली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या धगधगत्या इतिहासात चापेकर बंधूनी देशासाठी दिलेले योगदान देशवासियांना सतत प्रखर देशभक्तीची प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर बंधुंच्या समूह शिल्पास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

 

या अभिवादन प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षेनेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसदस्य सुरेश भोईर, अनंत कोऱ्हाळे यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि कर्मचारी उपस्थित हो

ते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments