Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedनोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे आधुनिक यकृत उपचार आणि प्रत्यारोपणावर सीएमई...

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे आधुनिक यकृत उपचार आणि प्रत्यारोपणावर सीएमई आयोजित

पुणे,22 एप्रिल 2026 : जागतिक यकृत दिनानिमित्त नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे नुकतेच ॲडव्हान्स्ड लिव्हर केअर ॲन्ड ट्रान्सप्लांट सीएमई – प्रोसेसेस,प्रोटोकॉल्स ॲन्ड केस बेस्ड लर्निंग चे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये 200 हून अधिक फिजिशियन्स व शल्यचिकित्सकांनी भाग घेतला.उद्घाटनप्रसंगी नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने,उपव्यवस्थापकीय संचालक डॉ.दिविज माने आदी मान्यवर उपस्थित होते.या सीएमई कार्यक्रमात यकृत प्रत्यारोपण, पारंपरिक इमेजिंग पलीकडे जाऊन फॅटी लिव्हरचे निदान, क्रॉनिक लिव्हर डिसीज, लिव्हर सिऱ्हॉसिस अशा अनेक विषयांचा समावेश होता.

 

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर मधील यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ.स्मिता पारेख यांनी योग्य व अचूक निदान आणि रूग्ण परिणाम सुधारण्यासाठी प्रमाणित प्रोटोकॉल्सचा अवलंब यावर भर दिला.

 

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे समूह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे म्हणाले की,यकृताचे आजार विशेष करून फॅटी लिव्हर आणि सिऱ्हॉसिस या मोठ्या आरोग्य समस्या म्हणून उदयास येत आहेत.त्यामुळे योग्य निदान आणि बहुशाखीय दृष्टीकोन महत्त्वाचा आहे.

 

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर मधील आयसीयू विभागाचे संचालक डॉ.झेड.ए.खान यांनी सांगितले की, विकसित होत असलेले उपचार प्रोटोकॉल्स, अवयव प्रत्यारोपणातील आधुनिकीकरण आणि वैद्यकीय उपचारांमधील निर्णय प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी हे सीएमई अत्यंत मोलाचे व्यासपीठ

ठरले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments