Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedसदु शिंदे क्रिकेट स्पर्धेत युथ डेवलपमेंट संघाचा महानगरपालिका क्रिकेट संघाने केला पराभव

सदु शिंदे क्रिकेट स्पर्धेत युथ डेवलपमेंट संघाचा महानगरपालिका क्रिकेट संघाने केला पराभव

पिंपरी, दि. १३ मार्च २०२४ :- सदु शिंदे लीग क्रिकेट स्पर्धा पुणे येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिकेट संघाने युथ डेव्हलपमेंट क्रिकेट संघाचा ८६ धावांनी पराभव करून दणदणीत विजय मिळवला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये रवी माचरे (५६ धावा), पलाश शिंदे (५१ धावा) या दोघांनी आक्रमक अर्धशतकी खेळी केली. त्यांना संतोष कोकणे (१७), महेश कुदळे (१२), योगेश साठे (१२), धावा करून संघाला ३८ षटकांमध्ये २३१ धावांपर्यंत पोहोचवले. युथ डेवलपमेंट संघाकडून प्रगज्योत सुर्वे यांनी ४ बळी, आदिनाथ, सुरज बोरावके, गोपीनाथ सुर्वे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

प्रत्युत्तरात युथ डेव्हलपमेंट क्रिकेट संघाने २९.५ षटकांमध्ये केवळ १४५ धावा केल्या आणि संपुर्ण संघ बाद झाला. फलंदाजीत अलिम शेख (७१ धावा), श्लोक मोरे (२० धावा) यांनी उत्तम खेळी केली. महापालिका संघाकडून विकास शिरवळे, पलाश शिंदे यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले तर महेश कुदळे २ बळी तर कृष्णा चव्हाण व योगेश साठे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. सामन्यामधे पलाश शिंदे यांनी फलंदाजीत ५१ धावा व गोलंदाजीत ३ बळी अशी अष्टपैलू खेळी करून सामनावीर हा पुरस्कार पटकावला.

संक्षिप्त धावफलक

पिंपरी चिंचवड महापालिका क्रिकेट संघ – ३८ षटकांमध्ये सर्व बाद २३१ धावा
रवी माचरे ५६, पलाश शिंदे ५१, संतोष कोकने (१७), महेश कुदळे (१२), योगेश साठे (१२), प्रगज्योत (४/४४), आदिनाथ (२/२६), गोपीनाथ सुर्वे (२/३०)

युथ डेव्हलपमेंट क्रिकेट संघ – आलिम शेख (७१), श्लोक शिंदे (२०), विकास शिरवळे (३/२१),पलाश शिंदे (३/३२), महेश कुदळे (२/१६), कृष्णा चव्हाण (१/१७), योगेश साठे (१/३६)

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments