त्र्यंबकेश्वर – मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विचारावर आधारित ‘विरासत भी, विकास भी’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त जलसंपदा विभागतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ या जलयात्रा आणि कलश पुजन कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. उत्तम शासक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव घेता येईल आणि कुठल्याही भागात दुष्काळ पडू नये, यासाठी अहिल्यादेवींनी जलसंवर्धनाचे सुरु केलेले कार्य आजही अव्याहतपणे सुरु असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले.
महिलांच्या शिक्षणापासून ते रोजगारापर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. शाश्वत विकासाच्या दिशेने जाण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. आज गोदा ते नर्मदाच्या माध्यमातून पाण्याचे संवर्धन करण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले.
‘निर्मल गोदावरी, अविरत गोदावरी’ अशी व्यवस्था आगामी काळात करणार असल्याचे सुद्धा फडणवीस यांनी सांगितले. तसेच जलसंधारणाचे जे कार्य हातात घेतले आहे ते पूर्ण करणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आधारित चित्रफितीचे उद्घाटन सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी गिरीश महाजन यांचा संकल्प असलेल्या उन्नत नाशिक अभियानाच्या लोगोचे अनावर फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि होळकर घरण्याचे युवराज यशवंतराव होळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत करताना मोदींच्या कार्याचे कौतुक करत दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला. कुंभ यात्रे दरम्यान ‘निर्मल गोदावरी, अविरत गोदावरी’ अशी व्यवस्था आगामी काळात करणार असल्याचे सुद्धा फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच जलसंधारणाचे जे कार्य हातात घेतले आहे ते पूर्ण करणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नदी जोड प्रकल्प जसे नद्यांना एकत्र जोडतो, तसेच ही यात्रा लोकमनाला, समाजाला आणि संस्कृतीला एकत्र जोडण्याचे कार्य करणार असल्याचे फडणवीस यांनी या उद्घाटन प्रसंगी सर्वांना संबोधित करताना सांगितले. जलसंवर्धनाबाबत जनजागृती करणे आणि पाणी बचतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, हा जलयात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी येथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या जलयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. ही जलयात्रेचा संगम शिर्डी येथे होणार आहे. यात्रेदरम्यान राज्यातील 30 पवित्र्य नद्याच्या पाण्याने नर्मदा पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी फडणवीस यांनी ही जलयात्रा केवळ प्रतिकात्मक नसून ती व्यापक लोकचळवळ ठरणार असल्याचे सांगितले. ही यात्रा समाजाला आणि संस्कृतीला एकत्र आणणारी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले
‘विरासत भी, विकास भी’ एकमेव संकल्प- फडणवीस ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ…
RELATED ARTICLES


