Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहायुतीतील घटकपक्षांकडून ही सत्तेच्या हव्यासा पोटी महाराष्ट्राच्या अस्मिताांचा अपमान सहन केला जात...

महायुतीतील घटकपक्षांकडून ही सत्तेच्या हव्यासा पोटी महाराष्ट्राच्या अस्मिताांचा अपमान सहन केला जात आहे..! *- काँग्रेस ची प्रखर टिका

*‘ज्ञानोबा – तुकोबां’ना छळणाऱ्या, शिवराज्याभिषेक ’ नाकारणाऱ्या प्रवृत्ती, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा डोके वर काढत आहेत..!*
*शिव छत्रपतींचे कर्तृत्व डागाळण्याचा निंदनीय प्रका
पुणे दि – २६
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा याने नागपूर येथील कार्यक्रमात महाराष्ट्राचे दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांचे बाबतीत कल्पोकल्पित विधान करून, शिव छत्रपतींचे कर्तृत्व डागाळण्याचा निंदनीय प्रकार, भाजप नेतृत्वाच्या उपस्थितीत करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा निंदनीय प्रयत्न केला असल्याची प्रखर टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या, उद्योग व रोजगार समस्या, वाढती महागाई व राज्यावरील वाढते कर्ज, गॅस टंचाई या प्रश्नांवर सरकार पुर्णपणे अपयशी ठरत असून.. ‘लोकश्रध्देला तडे जाणारे वाद जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा’ कुटील प्रयत्न सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेत होत आहेत ही बाब घृणास्पद आहे.

देशास दिशा देणाऱ्या, समाज क्रांतिकारकांच्या, राष्ट्र पुरुषांच्या व संतांच्या महाराष्ट्रात ज्या प्रवृत्तींनी,
संत निवृत्तीनाथ, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई या भावंडांचा तसेच जगास परमार्थाचा कल्याणाचा मार्ग दाखवणाऱ्या जगदगुरु तुकाराम महाराजांना आतोनात त्रास दिला, त्या ‘ज्ञानोबा – तुकोबां’ना छळणाऱ्या, शिवराज्य भिषेक’ नाकारणाऱ्या प्रवृत्ती, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा डोके वर काढत आहेत व या प्रवृत्तींना भाजप राजाश्रय’ देत असल्याने, ‘महाराष्ट्र द्रोही भाजप’ हा काँग्रेस चा आरोप सिद्ध होत असून ‘शिव छत्रपतींच्या शौर्याच्या इतीहासास’ जाणीव पुर्वक काळवंडण्याचे दूष्ट प्रयत्न होत आहेत..
महायुतीतील घटकपक्षांकडून, सत्तेलाठी महाराष्ट्राच्या अस्मितेवर जाणीवपूर्वक हल्ले होत असतांना महायुती सत्तेतील सहभागी घटक पक्ष देखील सत्तेच्या लाचारी पोटी महाराष्ट्राच्या दैवताचा अवमान सहन करत मुग गिळून गप्प बसला आहे.. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे..!

—————————————/

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments