Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedअविवा इंडियाकडून निवृत्तीच्या विविध गरजांसाठी अविवा सिक्युअर नेस्ट एन्युइटी प्लॅन

अविवा इंडियाकडून निवृत्तीच्या विविध गरजांसाठी अविवा सिक्युअर नेस्ट एन्युइटी प्लॅन

अविवा इंडियाकडून निवृत्तीच्या विविध गरजांसाठी अविवा सिक्युअर नेस्ट एन्युइटी प्लॅन

नवी दिल्ली, २८ एप्रिल २०२६: अविवा इंडियाने अविवा सिक्युअर नेस्ट अॅन्युटी प्लॅन सुरू करण्याची घोषणा केली असून तो एक निवृत्तीचा उपाय आहे. त्यामुळे ग्राहकांना एकदाच प्रीमियम भरण्यासह आयुष्यभर नियमित उत्पन्न मिळवता येते. ही योजना वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत नवीन योजना घेण्याची सुविधा देते. त्यामुळे निवृत्तीची योजना आखणाऱ्या व्यक्तींच्या विस्तृत श्रेणीसाठी ती उपलब्ध होते.

अविवा सिक्युअर नेस्ट अॅन्युटी प्लॅनमध्ये सिंगल लाइफ आणि जॉइंट लाइफ कव्हरेज, लवचिक पेआउट फ्रिक्वेन्सीसह आजीवन उत्पन्नाची हमी आणि नॉमिनीसाठी वारसा संरक्षित करण्यासाठी खरेदी किंमत परतावा वैशिष्ट्य अशा विविध गरजा भागविण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे रिटायरमेंट फंड रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या (पीएफआरडीए) नियमांशीदेखील सुसंगत आहे. त्यामुळे नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस) सदस्यांसाठी हा एक वेगळा पर्याय आहे. लवचिकता, काटेकोर पालन आणि कौटुंबिक संरक्षण एकत्र आणून अविवा सिक्युअर नेस्ट एन्युटी हा दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेसाठी एक व्यावहारिक उपाय असल्याचे सिद्ध होते.

अविवा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. असित रथ म्हणाले, “निवृत्ती हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तो सुरक्षा आणि प्रतिष्ठेने जोडला गेला पाहिजे. अविवा सिक्युअर नेस्ट अॅन्युटी प्लॅनसह आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या प्रियजनांच्या आर्थिक कल्याणाचे रक्षण करताना आयुष्यभरासाठी उत्पन्नाचा स्थिर प्रवाह आणण्याचा एक सोपा परंतु शक्तिशाली मार्ग देऊ करत आहोत.
अविवा इंडियाचे प्रमुख आणि नियुक्त अॅक्च्युअरी श्री. अजय कुमार त्रिपाठी म्हणाले, “हमी परतावा आणि लवचिकता यांचे संतुलन राखण्यासाठी अविवा सिक्युअर नेस्ट अॅन्युटी प्लॅनची काळजीपूर्वक रचना करण्यात आली आहे. जॉइंट लाइफ कव्हरेज आणि खरेदी किंमतीचा परतावा असे पर्याय देऊन आम्ही अशा ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करत आहोत ज्यांना स्थैर्य आणि कौटुंबिक संरक्षण दोन्ही हवे आहेत.”

अविवा लाइफ इन्शुरन्स इंडियाबाबत
अविवा लाइफ इन्शुरन्स कंपनी इंडिया लिमिटेड हा डाबर इन्व्हेस्ट कॉर्प आणि अविवा इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड या यूकेस्थित विमा समूहातील संयुक्त उपक्रम असून तिची स्थापना १६९६ साली झाली. अविवा लाइफ इन्शुरन्स इंडिया नाविन्यपूर्ण विमा उपाय आणि ग्राहककेंद्री उपक्रमांद्वारे आपल्या ग्राहकांचे आर्थिक कल्याण करण्यासाठी समर्पित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments