Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorized१४ ते १६ मार्च दरम्यान व्हॉट हाय-फाय शो चे आयोजन

१४ ते १६ मार्च दरम्यान व्हॉट हाय-फाय शो चे आयोजन

पुणे, ३ मार्च २०२४ : पीटीसी तर्फे सादर होत असलेल्या आणि बेनक्यू ७४१ व जेनेलेक तर्फे समर्थित सेंट रेजिस मुंबई येथे 14 मार्च (गुरुवार) ते 16 मार्च (शनिवार) या कालावधीत ऑडिओफाइल, टेक्नोफाइल्स आणि गॅझेट प्रेमींकरीता व्हॉट हाय-फाय शो चे आयोजन करण्यात आले आहे. या शोमध्ये आकर्षक ऑडिओ,अत्याधुनिक होम-थिएटर्स, उत्तम उपकरणे आणि एव्ही फर्निचर पाहायला मिळणार आहेत. होम थिएटर आणि ऑडिओ सिस्टीममधील नवीनतम कल्पनांवर प्रकाश टाकण्याबरोबरच या शो दरम्यान बेनक्यू च्या नवीनत आणि उत्कृष्ट फोर के होम सिनेमा लेझर प्रोजेक्टर डब्ल्यू५८०० सादर करण्यात येणार आहे. याबरोबर बोवर्स एंड विल्किंस 800 सिग्नेचर सीरीज एक्सक्लूसिव अनुभवायला मिळणार आहे. लेसर प्रोजेक्टर, डॉल्बी ॲटमॉस स्पीकर सिस्टीम, हाय-एंड ऑडिओ, टर्नटेबल्स अशा बऱ्याच गोष्टी एकत्र आणणारा हा अशा प्रकारचा एकमेव शो आहे. या शो मध्ये जगातील 50 हून अधिक उत्कृष्ट ऑडिओ आणि व्हिडिओ ब्रँड्स सहभागी होणार आहेत, जे ऑटोमेशन किंवा होम-थिएटर सिस्टीमसह नवीन अपार्टमेंट्स सजवू पाहणाऱ्यांसाठी एक वन-स्टॉप शॉप ठरतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments