Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात सीग्रामच्या रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स तर्फे ‘सिलेक्ट...

पुण्यात सीग्रामच्या रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स तर्फे ‘सिलेक्ट फिल्म्स, सिलेक्ट कॉन्व्हर्सेशन’ चे आयोजन होस्ट मंदिरा बेदी यांनी अभिनेते जिम सरभ, निमृत कौर अहलुवालिया, लेखक तिग्मांशू धुलिया आणि गीतकार-अभिनेता स्वानंद किरकिरे यांच्याशी संवाद साधला

पुणे,१६ डिसेंबर, 2023: भारतातील शॉर्ट फिल्म फॉरमॅटमध्ये अग्रणी, सीग्रामच्या रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सने ने पुण्यामध्ये सिलेक्ट फिल्म्स सिलेक्ट कॉन्व्हर्सेशन्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सने गेल्या काही वर्षांत ६ फिल्मफेअर पुरस्कार आणि ऑस्कर पात्रता जिंकली आहे ज्यामुळे हे व्यासपीठ भारतातील लघुपटांसाठी सर्वात मोठे आणि सर्वात विश्वासार्ह ठिकाण बनले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला गुरुग्राम आणि कोलकाता येथे दोन यशस्वी ऑन-ग्राउंड कार्यक्रमांनंतर, ‘सिलेक्ट फिल्म्स, सिलेक्ट कॉन्व्हर्सेशन्स’चा शनिवार,१६ डिसेंबर रोजी द बोट क्लब, पुणे येथे कार्यक्रम पार पडला. संध्याकाळच्या वेळी, होस्ट मंदिरा बेदी यांनी जिम सरभ, निमृत कौर अहलुवालिया, तिग्मांशु धुलिया आणि स्वानंद किरकिरे यांच्याशी एक सुंदर संभाषण केले. ‘सिनेमाज शापेशिफ्टर्स: क्रॉसिंग आणि ट्रान्सफॉरमेशन्स’ ही संध्याकाळची थीम असल्याने भारतीय चित्रपटांची उत्क्रांती, शैलीतील विविधता आणि लघुपटाचे स्वरूप यावर चर्चा झाली. या संभाषणाला कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. यानंतर निवडक रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सचे सादरीकरण करण्यात आले.

त्यापूर्वी जिम सरभ, निमृत कौर अहलुवालिया, तिग्मांशु धुलिया आणि स्वानंद किरकिरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधला ज्यामध्ये उपस्थित कलाकारांनी फिचर फिल्म आणि ओटीटी प्लॅटफॉर्मशी तुलना करता शॉर्ट फिल्म्स वर काम करणे कसे आव्हानात्मक आहे तसेच शॉर्ट फिल्म्सच्या भविष्याविषयी आपले विचार मांडले.

ऍक्टीवेशन प्लॅटफॉर्म मागील कल्पनेबद्दल बोलतांना पर्नोड रिकार्ड इंडियाचे सीईओ कार्तिक मोहिंद्रा म्हणाले, “वर्षभरात, रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स विकसित होत आहेत, याबाबत जाणून घेण्याची ओढ असलेल्या आणि विवेकी प्रेक्षकांसाठी जागतिक दर्जाचे कथाकथन करणारी परिसंस्था निर्माण करत आहे, अशा प्रकारे भारतीय लघुपटांसाठी ‘डेस्टिनेशन’ बनले आहे. सिलेक्ट फिल्म्स, सिलेक्ट कॉन्व्हर्सेशन्स, ब्रँडचे परस्परसंवादी प्लॅटफॉर्म, या विचारसरणीचे मूर्त स्वरूप आहे, ज्यामध्ये आम्ही शॉर्ट फिल्म फॉरमॅटचे मुळ स्वरूप शोधण्याचा आणि क्रिएटीव शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि आजच्या सिनेमाच्या स्वरूपात त्याला सेट करतो.”

कलाकार जिम सरभ म्हणाले , “रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स सोबत ‘सिलेक्ट फिल्म्स, सिलेक्ट कॉन्व्हर्सेशन्स’ या माध्यमातून माझे सहकार्य सुरू ठेवताना मला आनंद होत आहे. या अनोख्या अनुभवाचा एक हिस्सा बनणे आणि इंडस्ट्रीतील माझ्या समकालीन लोकांसोबत सिनेमाच्या संभाषणात भाग घेणे याचा फार आनंद वाटतो.”

लेखक दिग्दर्शक टिगमान्शू धुलिया या प्लॅटफॉर्मबद्दल बोलतांना म्हणाले “रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स भारतीय सिनेमॅटिक लँडस्केपमध्ये शॉर्ट फिल्म फॉरमॅटमध्ये आघाडीवर आहे. त्यांच्याशी निगडीत असणे आणि सिलेक्ट फिल्म्स, सिलेक्ट संभाषणांसाठी याठिकाणी असणे हे माझ्यासाठी फारच आश्चर्यकारक आहे. भारतीय चित्रपट रसिकांसाठी, प्रेक्षक आणि कलाकार दोघांसाठी हे एक समृद्ध करणारे व्यासपीठ आहे.”

कलाकार निर्मीत कौर अहलुवालिया त्याचे विचार मांडतांना म्हणाले , “याचा एक हिस्सा होण्यासाठीचे हे एक अतिशय प्रेरणादायी व्यासपीठ आहे असे मला वाटते. कलाकार आणि प्रेक्षकांसाठी एकत्र येण्याची आणि भारतीय चित्रपटांबद्दलच्या प्रेमाबद्दल बोलण्याची ही एक संधी आहे. आमचा उद्योग कसा विकसित होत आहे यावर चर्चा करण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी देखील हे एक सुंदर व्यासपीठ आहे. असा पर्याय तयार केल्याबद्दल आणि त्यात माझा सहभाग घेतल्याबद्दल रॉयल स्टॅग बॅरलच्या टीमचे अभिनंदन.”

गीतकार आणि अभिनेते स्वानंद किरकिरे या प्लॅटफॉर्म बद्दल बोलतांना म्हणाले, “मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हापासून भारतीय चित्रपटसृष्टी प्रचंड विकसित झाली आहे. आज विविध प्रकारचे चित्रपट बनवले जात आहेत आणि त्यांचे कौतुक होत आहे. शॉर्ट फिल्म्स बघायला प्रेक्षकांना कुठेही जागा मिळत नाही त्यांच्यासाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments