Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedअहिल्यानगरमध्ये ‘भोंदू बाबा’चा पर्दाफाश! ₹100 कोटी साई सेवा काष्टीत घोटाळा उघड केला–*...

अहिल्यानगरमध्ये ‘भोंदू बाबा’चा पर्दाफाश! ₹100 कोटी साई सेवा काष्टीत घोटाळा उघड केला–* *सहकार आयुक्तांचे ठेवीदारांना ₹ 3 कोटी परत करण्याचे आदेश”*

 

 

*’शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी अहिल्यानगर सह पुणे सहकार आयुक्तालय हादरवले – पुढची कारवाईवर, प्रशासनावर सर्वांचे लक्ष!*

 

 

*पुणे, दि. 01 मे 2026:*

*अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे ‘साई सेवा’ पतसंस्थां व मल्टीस्टेट संस्था मधील सुमारे ₹100 कोटींहून अधिकचा आर्थिक घोटाळ्याचा मोठा भांडाफोड 30 एप्रिल रोजी सहकार आयुक्त कार्यालयात प्रचंड आंदोलनामुळे झाला आहे. शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार आणि शेकडो ठेवीदारांनी एकत्र येत साई सेवा पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव सोनबा पाचपुते सचिव व कार्यकारी संचालक गणेश अरुण डोईफोडे यांच्यासह, समाधान महाराज शर्मा या कथित भोंदू बाबाचा पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणात साई सेवा पतसंस्था व मल्टीस्टेटचे संचालक मंडळ व संबंधितांनी ठेवीदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून शेकडो कोटींचा निधी उभारला आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. प्रकरणी प्राथमिक तपासात सिद्ध झाले आहे आता आयुक्तांनी तात्काळ चौकशीचे आदेश देऊन कलम 88 अन्वये व फौजदारी कारवाईचे आदेश पत्र आदेशित केले आहे.

विशेषतः संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव पाचपुते व सचिव कार्यकारी संचालक गणेश डोईफोडे व भोंदू बाबा समाधान महाराज शर्मा यांनी संगणमताने २ कंपन्यांसाठी सुमारे ₹29.11 कोटींचे कर्ज घेऊन ते इतर ३/४ सर्विस संस्थां कंपन्यांमध्ये वळवण्यात आल्याचेही उघड झाले आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत सहकार विभागाच्या आयुक्तांनी तात्काळ ₹ 3 कोटी ठेवीदारांना परत देण्याचे लेखी आदेश दिले असून संस्थेवर प्रशासक नेमलेले आहेत व त्यांना सोमवार दिनांक 4 मे पर्यंत सखोल चौकशीचे निर्देश देत अहवाल सादर करण्याचे आदेशित केले आहेत.

दरम्यान, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आणि उर्वरित देविदारांच्या ठेवी व्याजासह रक्कम परत न मिळाल्यास 4 मे 2026 पासून काष्टी मल्टीस्टेट व पतसंस्था कार्यालयासमोर तहसील पोलीस व कलेक्टर कार्यालयासमोर बँड बाजा लावून बेमुदत सत्याग्रह आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे सहकार आयुक्त कार्यालय येथे शेकडो ठेवीदारासह आंदोलनाचे प्रमुख विठ्ठल राजे पवार ठेवीदार कृती समिती सारंग पाचपुते आशा ताटे शिवाजी खोमणे हनुमंत कदम प्रीतम पाचपुते सूर्यकांत निंबाळकर मोहिनी गिरमकर संघटनेचे युवक अध्यक्ष महेश गिरी संतोष सुगवेकर आधी अडीचशे हुन अधिक ठेवीदार यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलन गेटवर न करता थेट सहकार कार्यालयात घुसून आंदोलन केले त्यावेळी प्रशासन खडबडून जागे होत तत्काळ आदेश दिलेले आहेत अशी माहिती विठ्ठल राजे पवार यांनी प्रसिद्धी दिलेला पत्रकात म्हटले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments