Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedजंगली महाराज रस्त्यावरील विनावापर पडून असलेल्या मॅकेनाईज्ड पार्किंगचा पांढरा हत्ती पोसू नका....

जंगली महाराज रस्त्यावरील विनावापर पडून असलेल्या मॅकेनाईज्ड पार्किंगचा पांढरा हत्ती पोसू नका. -संदीप खर्डेकर.

पुणे. जंगली महाराज रस्त्यावरील विनावापर पडून असलेल्या मॅकेनाईज्ड पार्किंगचा पांढरा हत्ती पोसू नका अशी स्पष्ट मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पुण्याचे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे

 

 

 

जंगली महाराज रस्त्यावर छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर 2007 साली उभारण्यात आलेले मॅकेनाईज्ड पार्किंग अनेक वर्षे विनावापर पडून आहे. मुळात हे उभारल्यानंतर देखील याचा अत्यल्प वापर झाला कारण त्या काळात यांत्रिक पार्किंग बाबत नागरिकांच्या मनात शंका होत्या आणि तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात पार्किंग चा प्रश्न नव्हता. तेव्हा मी भारतीय जनता युवा मोर्चा चा अध्यक्ष ह्या नात्याने सदर पांढरा हत्ती पोसण्याबाबत मनपा विरोधात आंदोलन देखील केले होते.

 

 

 

मात्र आता वीस वर्षांच्या कालावधीत निम्मा काळ सदर पार्किंग बंदच आहे. दोन वर्षांपूर्वी याबाबत पाठपुरावा केला असता मेट्रो सोबत याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

 

मात्र सध्यातरी हे धूड तेथे विनावापर पडून असून त्याभोवती कचरा साचल्याचे दिसून येते. जाणकारांच्या मते आता गाड्यांचा आकार वाढल्याने ह्याचा वापर होणे शक्य नाही आणि मुळात हे आर्थिकदृष्ट्या देखील हे व्यवहार्य नाही.त्यामुळे ह्या पार्किंग स्थळाचे नूतनीकरण करणे म्हणजे नव्याने पांढरा हत्ती पोसण्यासारखे होईल.

 

तरी सदर पार्किंग बाबत योग्य निर्णय त्वरित घ्यावा अशी आग्रही मागणी

करत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments