Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorized*पुण्याच्या सेफपॅक इंडस्ट्रीजला जर्मनीत दोन जागतिक ‘वर्ल्डस्टार सस्टेनेबिलिटी अवॉर्ड’*

*पुण्याच्या सेफपॅक इंडस्ट्रीजला जर्मनीत दोन जागतिक ‘वर्ल्डस्टार सस्टेनेबिलिटी अवॉर्ड’*

 

पुणे — दिनांक 11 मे 2026—

पुण्यातील ६० वर्षांची परंपरा असलेल्या पॅकेजिंग आणि स्पेशालिटी पॅकेजिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सेफपॅक इंडस्ट्रीज लिमिटेडने जर्मनीतील ड्युसेलडॉर्फ येथे आयोजित इंटरपॅक २०२६ प्रदर्शनादरम्यान झालेल्या प्रतिष्ठेच्या वर्ल्डस्टार अवॉर्ड्स(युनायटेड नेशन्स पुरस्कृत) दिनांक 8 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात दोन मानाचे वर्ल्डस्टार सस्टेनेबिलिटी अवॉर्ड पटकावले. यामुळे कंपनीच्या नावावर आता एकूण पाच जागतिक सस्टेनेबिलिटी पुरस्कारांची नोंद झाली आहे.

हे पुरस्कार *वर्ल्ड पॅकेजिंग ऑर्गनायझेशन (WPO)* च्या *अध्यक्षा ल्युसियाना पेलेग्रिनो* यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. जगभरातील पॅकेजिंग उद्योगातील मान्यवर, संशोधक आणि उद्योजक या सोहळ्यास उपस्थित होते.

सेफपॅकला खालील उत्पादनांसाठी हे पुरस्कार मिळाले :

#बायो-कॉम्पोस्टेबल बॅरियर क्राफ्ट पेपर फॉर पोर्शन पॅक्स

#हाय स्ट्रेंथ इको-फ्रेंडली रॅपर

पर्यावरणपूरक आणि शाश्वत पॅकेजिंग क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कामासाठी हे पुरस्कार देण्यात आले.

यावेळी बोलताना सेफपॅक इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक राजेंद्र तापडिया म्हणाले,

“शाश्वतता (sustainability) ही उद्याची गरज आहे आणि भारताने यासाठी सज्ज झाले पाहिजे. डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि डॉक्टर अब्दुल कलाम सरांनी आम्हाला भारताने जगाकर्ता संशोधन करावे अशी प्रेरणा दिली व त्यातूनच आमचा हा प्रवास चालू आहे”

कंपनीचे संचालक आनंद तापाडिया म्हणाले,

“जागतिक स्तरावर सस्टेनेबिलिटीबाबत वाढत असलेला उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यामुळे अधिक संशोधन आणि पर्यावरणपूरक उत्पादनांच्या विकासासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे.”

सहा दशकांपासून कार्यरत असलेल्या सेफपॅक इंडस्ट्रीज लिमिटेडने पॅकेजिंग क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक उपाय विकसित करत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments