Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorized*चारचाकी वाहनांच्या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकरिता फेसलेस सुविधा*

*चारचाकी वाहनांच्या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकरिता फेसलेस सुविधा*

 

पुणे, दि. १३: चारचाकी खासगी वाहनाकरिता एमएच १२-झेड एस या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन आरक्षित करण्याकरिता १४ मे, २०२६ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून फेसलेस सुविधा सुरु होणार आहे; ऑफलाईन पद्धतीने पसंती क्रमांक शुल्क स्वीकारले जाणार नाहीत, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

पसंती क्रमांक आरक्षीत करण्याकरिता https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर, नाव व आधार संलग्नित मोबाईल क्रमांक टाकून नाव नोंदणी करावी व त्यानंतर अर्ज व शुल्क भरणा करून पसंती क्रमांक आरक्षित करता येईल, असेही कळविले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments