Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedविशेष वृत्त साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरी

विशेष वृत्त साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरी

पुणे, दि. १३: ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ३ हजार ५७४.९३ लक्ष रुपयाच्या पुरक टंचाई आराखड्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी दिली आहे.

 

पुणे जिल्हातील भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ टंचाई कृती आराखडा १ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर २०२५, १ जानेवारी ते ३१ मार्च २०२६, व १ एप्रिल ते ३० जून २०२६ या कालावधीचा संभाव्य पाणी टंचाई त्रैमासिक कृती आराखडा १ जानेवारी २०२६ रोजीच्या पत्रान्वये सन २०२५-२६ साठी ३ हजार ५६४.४० लक्ष रुपयाचा मंजूर करण्यात आला होता, त्यानंतरच्या कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुक पार पाडल्या. नवनिर्वाचित सदस्यांनी पाणी टंचाई निवारणाच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविल्या होत्या, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ७ मे २०२६रोजी पुरक टंचाई आराखड्यास मंजूरी दिली आहे.

 

एप्रिल २०२६ ते जुन २०२६ मंजुर पुरक टंचाई आराखडा व उपाययोजना निहाय माहिती पुढीलप्रमाणे आहेत. नवीन विंधन विहिरी घेणे, कुपनलिका -१०१५.२५ लक्ष रुपये, नळपाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती १२२१.५१ लक्ष रुपये, विंधन विहीरीची विशेष दुरुस्ती- १४०.१७ लक्ष रुपये, टँकरने पाणी पुरवठा करणे-१४४.५० लक्ष रुपये, खाजगी विहिरी अधिग्रहित करणे – २९२.७० लक्ष रुपये, विहीरी खोल करणे, गाळ काढणे-२६.८५ लक्ष रुपये, स्त्रोत बळकटीकरण उपाययोजना ७२४ लक्ष रुपये तसेच प्रगतीपथावरील नळ पाणी पुरवठा योजना पुर्ण करणे- ९.९५ लक्ष रुपये असा एकूण ३ हजार ५७४.९३ लक्ष रुपयाचा पुरक आराखड्यास मंजूरी देण्यात आली आहे.

 

सद्यःस्थितीत जिल्ह्यामध्ये ७३ टँकरने ७१ गावे व ३५८ वाडपावस्त्यांना पाणीपुरवठा सुरु आहे. तसेच बधित पशुधन १३ हजार ४७३ इतके आहे, अशी माहिती श्री. पाथरवट यांनी दिली आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments