Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीव्हीपी काॅलेज तर्फे ‘आर्किटेक्चरल कोषंट २०२६’ स्पर्धा संपन्न

पीव्हीपी काॅलेज तर्फे ‘आर्किटेक्चरल कोषंट २०२६’ स्पर्धा संपन्न

भानूबेन नानावटी कॉलेजच्या संघाची बाजी
विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रस्ट संचालित पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने स्पर्धेचे आयोजन
सर्वाधिक संघांचा सहभाग नोंदविल्याबद्दल एनआयसीएमएआर स्कूल ऑफ आर्किटेक्चरला विशेष पारितोषिक

पुणे : विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रस्ट संचालित पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पिरंगुट, पुणे यांच्या वतीने ‘आर्किटेक्चरल कोषंट २०२६’ या आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डेक्कन जिमखाना येथील श्री महावीर जैन विद्यालयाच्या बीएमएस सभागृहात ही स्पर्धा पार पडली. पुणे शहरातील वास्तुकला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे १५वे वर्ष होते.

स्पर्धेत पुण्यातील १३ वास्तुकला महाविद्यालयांतील एकूण ६८ संघांनी सहभाग घेतला. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या तानिया भियानी आणि देविका मंधाने यांनी प्रथम क्रमांक मिळवत १२ हजार रुपये रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र पटकावले. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या शांभवी शिंदे आणि रिया पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळवत ८ हजार रुपये रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र मिळविले. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या तक्षील कडू आणि अनिरुद्ध शाह यांनी तृतीय क्रमांक मिळवत ६ हजार रुपये रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र पटकावले.

अंतिम फेरीत विविध विषयांवरील आठ फेऱ्यांची प्रश्नमंजुषा रंगली. या फेरीचे सूत्रसंचालन पी. व्ही. पी. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या ज्येष्ठ प्राध्यापिका आर्कि. विजया श्रीनिवासन यांनी केले.

यंदाच्या प्रश्नमंजुषेची मध्यवर्ती संकल्पना ‘वास्तुकलेतील महिलांचे योगदान’ अशी होती. या विषयावर आधारित विविध फेऱ्यांसाठीचे प्रश्न पी. व्ही. पी. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राध्यापक आर्कि. आरथी चंद्रशेखर आणि आर्कि. देवेंद्र देशपांडे यांनी संशोधन करून तयार केले.

सीसीबीए डिझाइन्स या पुण्यातील नामांकित वास्तुकला संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक रामप्रसाद अक्कीसेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘पुण्यातील सर्व वास्तुकला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी विचार करावा.’

उर्वरित तीन अंतिम संघांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. बी. के. पी. एस. कॉलेजच्या आयुष खेमनर आणि वृषभ एकवे, पी. व्ही. पी. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या पार्थ दामाहे आणि रौनक लुंकड तसेच बी. एन. सी. ए. कॉलेजच्या सृष्टी सिंग चौहान आणि दीपिका वर्मा यांना ही पारितोषिके देण्यात आली. अंतिम फेरीतील सर्व संघांना सीसीबीए डिझाइन्सतर्फे वास्तुकलेवरील पुस्तकांचा संचही देण्यात आला.

सर्वाधिक संघांचा सहभाग नोंदविल्याबद्दल एनआयसीएमएआर स्कूल ऑफ आर्किटेक्चरला विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. एनआयसीएमएआरतर्फे एकूण १३ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

‘आर्किटेक्चरल कोषंट २०२६’चे संपूर्ण नियोजन महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या आर्कि. सुचिता सयाजी, उपप्राचार्या डॉ. वंदना पुसाळकर आणि ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. आर्कि. शेखर गरुड यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सचिव जितेंद्र पितळीया तसेच विश्वस्त युवराज शाह उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments