Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorized*‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे...

*‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*

पुणे दि.18: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास, जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करून देणे आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार’ तसेच ‘डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथ मित्र) पुरस्कार’ देण्यात येतात. सन २०२५-२६ या वर्षासाठी इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांनी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे १ लाख, ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथपेटी देऊन गौरविण्यात येणार आहे.

राज्यातील एका राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एका राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथपेटी देण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथपेटी देऊन गौरविण्यात येणार आहे.
सन २०२५-२६ या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणाऱ्या ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments