Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedनागरी संरक्षण स्वयंसेवकांचा प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रम १५ मे रोजी पुण्यात*

नागरी संरक्षण स्वयंसेवकांचा प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रम १५ मे रोजी पुण्यात*

 

पुणे, दि. 14 (जिमाका, वृत्तसेवा): उपनियंत्रक, नागरी संरक्षण, पुणे कार्यालयामार्फत “ऑफ सिंदूर” पश्चात “ऑफ अभ्यास” अंतर्गत ३६० स्वयंसेवकांना क्षमता बांधणी व विकास प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा कार्यक्रम केंद्रिय गृह विभाग तसेच राज्य गृह विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शासनामार्फत राबविण्यात आला होता.

सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या स्वयंसेवकांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. यानिमित्त आयोजित प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रम शुक्रवार १५ मे २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सेवाभवन, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे, पुणे – ४११००५ येथे आयोजित करण्यात आला आहे.

तरी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व स्वयंसेवकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन उपनियंत्रक, नागरी संरक्षण, पुणे यांनी केले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments