ही जाहिरात आजच्या धावपळीच्या जीवनात दररोज स्वतःला ताजेतवाने आणि ऊर्जावान ठेवण्याचा संदेश देते.
बेंगळुरू, 15 मे 2026: विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटिंगचा प्रमुख ब्रँड असलेल्या संतूरने संतूर लाइम साबणासाठी नवीन टीव्ही जाहिरात लाँच केली आहे. ही जाहिरात आजच्या व्यस्त दिनचर्येत दररोज स्वतःला पुन्हा ताजेतवाने आणि रिचार्ज करण्याच्या कल्पनेवर आधारित आहे.
“3x फ्रेशनेस” या आश्वासनासह हा साबण प्रत्येक वापरानंतर दीर्घकाळ ताजेपणाची अनुभूती देतो. संतूर लाइम साबणामध्ये लिंबू, एलोवेरा आणि मेंथॉल यांचे मिश्रण आहे, ज्यामुळे थंडावा देणारा आणि ताजेतवाना करणारा आंघोळीचा अनुभव मिळतो.
टिल्ट ब्रँड सोल्युशन्सने संकल्पित केलेली ही टीव्ही जाहिरात एका शिक्षिकेची कथा दाखवते, जी एक आईसुद्धा आहे. ती शाळा आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळते. दिवसभराच्या धावपळीत ती थकलेली दिसते, तिच्यावरचा ताण जाणवू लागतो, पण थोडी विश्रांती मिळाल्यानंतर तिचा मूड बदलतो. त्यानंतर संतूर लाइम साबणाने आंघोळ केल्यानंतर ती पूर्णपणे “100% रिचार्ज” झाल्यासारखी ताजेतवानी होते आणि पुन्हा उत्साहाने आपले काम पुढे सुरू करते.
या मोहिमेबद्दल बोलताना, एस. प्रसन्ना राय, चीफ मार्केटिंग ऑफिसर, विप्रो कन्झ्युमर केअर म्हणाले, “लिंबू, एलोवेरा आणि मेंथॉल या तीन घटकांचे फायदे एकत्र करून आम्ही साबणाचा फ्रेशनेस अनुभव अधिक चांगला आणि ताजेतवाना केला आहे. यामुळे आंघोळ केल्यानंतर शरीराला अधिक ताजेतवाने वाटते. ही मोहीम थकलेल्या अवस्थेतून पुन्हा उत्साहाने दिवसाला सामोरे जाण्याचा नैसर्गिक अनुभव दाखवते.
आदर्श अटल, चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर, टिल्ट ब्रँड सोल्युशन्स यांनी सांगितले, “ही मोहीम केवळ ताजेतवाने वाटण्याबद्दल नाही, तर पुन्हा रिचार्ज’ होण्याच्या अनुभवावर आधारित आहे. यामध्ये बॅटरीची चार्जिंग कमी होणे आणि पुन्हा चार्ज होणे हे उदाहरण वापरून दाखवले आहे की, दिवसभर अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना आपली ऊर्जा कशी कमी होते. त्यामुळे पूर्ण थकलेल्या अवस्थेतून पुन्हा उत्साही आणि ऊर्जावान होण्याचा बदल अगदी सोप्या आणि सहज समजेल अशा पद्धतीने दाखवण्यात आला आहे.
ही मोहीम टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित स्वरूपात सुरू केली जाणार आहे.
संतूर लाईम हा साबण आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात येथील किरकोळ दुकानांमध्ये तसेच प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 100 ग्रॅम आणि मोठ्या पॅक साइजमध्ये
उपलब्ध आहे.


