Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedएच२ई पॉवर सिस्टिम महाराष्ट्र राज्य  फीडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा मुलांच्या...

एच२ई पॉवर सिस्टिम महाराष्ट्र राज्य  फीडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा मुलांच्या गटात सोलापूरचा मानस गायकवाड आघाडीवर  मुलींमध्ये चार खेळाडू संयुक्तपणे आघाडीवर 

 

 

पुणे दिनांक १६ मे २०२६

एच२ई पॉवर सिस्टिम महाराष्ट्र राज्य फीडे मानांकन १९ वर्षाखालील गटाच्या बुद्धिबळ स्पर्धेतील पाचव्या फेरीअखेर मुलांच्या गटात सोलापूरचा मानस गायकवाड याने पाच गुणांसह आघाडी घेतली आहे. मुलींमध्ये सई पाटील, आरना गुप्ता, श्रद्धा बजाज (सर्व पुणे) आणि ईश्वरी जगदाळे (सांगली) यांनी प्रत्येकी ४.५ गुणांसह पाचव्या फेरी अखेर संयुक्त आघाडी घेतली आहे.

 

गणेश सभागृह व अश्वमेध कार्यालय या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मुलांच्या गटात मानस गायकवाड याने प्यादी व मोहरे यांच्या सहाय्याने सुरेख डावपेच करीत पुण्याच्या भुवन शितोळे याला पराभूत केले. या गटात अथर्व सोनी (ठाणे), वीरेश शरणार्थी , अयान सोमानी, अलौकिक सिन्हा, शिवम पेटकर (सर्व पुणे), विश्वादित्य अवस्थी (नागपूर) हे संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर असून त्यांचे प्रत्येकी ४.५ गुण झाले आहेत. अव्वल दर्जाचा खेळाडू वीरेश याला अथर्व सोनी याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली.

 

मुलींमध्ये पहिल्या पटावर सई पाटील व ईश्वरी जगदाळे यांच्यातील लढत बरोबरीत सुटली तर श्रद्धा बजाज हिने सोलापूरच्या सान्वी गोरे हिच्यावर सफाईदार विजय मिळविला. गुप्ता हिने कोल्हापूरच्या दिशा पाटील हिला कल्पक डावपेच करीत पराभूत केले. पाचव्या फेरी अखेर आठ खेळाडूंनी प्रत्येकी चार गुण घेतले आहेत. या स्पर्धेतील शेवटच्या दोन फेऱ्या रविवारी होणार आहेत.

 

या स्पर्धेचे पाचव्या फेरीतील काही महत्त्वाचे निकाल पुढीलप्रमाणे- १९ वर्षाखालील मुले- मानस गायकवाड (सोलापूर) वि. वि. भुवन शितोळे (पुणे), अथर्व सोनी (ठाणे) बरोबरी विरुद्ध वीरेश शरणार्थी (पुणे), अयान सोमानी (पुणे) वि. वि. ब्रिजेश कश्यप (सांगली), अलौकिक सिन्हा (पुणे), वि.वि. पलश मापारा (पालघर), शिवम पेटकर (पुणे) वि.विरुद्ध तौसीन तडवी (जळगाव).

 

मुली- सई पाटील (पुणे) बरोबरी विरुद्ध ईश्वरी जगदाळे (सांगली), श्रद्धा बजाज (नागपूर) वि.वि. सान्वी गोरे (सोलापूर), आरना गुप्ता (पुणे) वि. वि‌ दिशा पाटील (कोल्हापूर)

—+++—

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments