Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedपु. ल. देशपांडे उद्याना समोरील अतिक्रमणावर कारवाई

पु. ल. देशपांडे उद्याना समोरील अतिक्रमणावर कारवाई

पुणे :   पु. ल. देशपांडे उद्यानाच्या प्रवेशद्वारातील अतिक्रमण व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी  याबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी त्यात विशेष लक्ष दिले. त्यानी ही माहिती पर्वतीच्या आमदार व नामदार माधुरीताई मिसाळ यांना सांगितली. त्यावर श्रीमती मिसाळ यांनी त्वरित त्यांचे ओ एस डी मंदार रांजेकर यांना सूचना दिल्या व त्यांनी अतिक्रमण विभाग प्रमुख सोमनाथ बनकर साहेबांना सूचना केली…

त्यानुसार आज त्वरित कारवाई करण्यात आली व आत्ता संपूर्ण परिसराने मोकळा श्वास घेतला.या कारवाई नंतर संदीप खर्डेकर म्हणाले की मी सामान्य पुणेकरांची भावना मांडली आणि नामदार माधुरीताई मिसाळ व मनपाचे अतिक्रमण प्रमुख सोमनाथ बनकर साहेबांनी त्वरित कारवाई केली याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार 🙏 तसेच तेथे अतिक्रमण विभागाचे फिक्स पॉईंट करण्यात आले असून पुन्हा अतिक्रमण होऊ नये याची दक्षता घेण्यात येतं आहे असे श्री. बनकर यांनी स्पष्ट केले आहे. ना. माधुरीताई मिसाळ पुण्यात आल्यावर यातील अधिकृत विक्रेत्यांच्या पुनर्वसना बाबत सकारात्मक निर्णय करणार असल्याचे मंदार रांजेकर यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments