Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedकर्करोग रुग्णालयाला श्री.गोळवलकर गुरुजींचे नाव द्यावे - माजी विरोधी पक्षनेते यांची सुचना

कर्करोग रुग्णालयाला श्री.गोळवलकर गुरुजींचे नाव द्यावे – माजी विरोधी पक्षनेते यांची सुचना

पुणे – बाणेर येथे महापालिकेच्या कर्करोग रुग्णालयाला श्री.गोळवलकर गुरुजी यांचे नाव द्यावे अशी सूचना महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी महापौर मंजुषा नागपूरे  यांच्याकडे केली आहे.यासंबंधी महापौर मंजुषा नागपूरे यांच्याकडे दिलेल्या पत्रात म्हटले आहे की पीपीपी तत्त्वावर काल बाणेर येथे कॅन्सर रुग्णालयाचे उद्घाटन झाले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे उपस्थित होते त्यांचे हस्तेच या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

त्यापूर्वी या रुग्णालयाच्या नामकरण बाबत समाज माध्यमांमध्ये वेगवेगळी चर्चा चालू होती इशारे प्रती इशारे चालू होते… आम्ही बघत होतो…

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग नऊ मध्ये हा प्रकल्प होणार आहे जरी हा त्या प्रभागात होऊ घातला तरी हा शहराचा प्रकल्प आहे..

या प्रकल्पास आपले सर्वांचे आदरणीय परमपूजनीय गोलवलकर गुरुजी कर्करोग रुग्णालय असे नामकरण करणे योग्य होईल असे आम्हाला वाटते.

आपणास माहित असेलच परमपूजनीय श्री गुरुजी यांचे कर्करोगाने निधन झाले होते.

आपण सर्वजण श्री गुरुजींच्या आणि संघाच्या मुशीतनं तयार झालेले कार्यकर्ते आहोत.

अशा वेळेला महापौर म्हणून आपण पुढाकार घेऊन पूजनीय श्री गुरुजींचे नाव द्यावे ही विनंती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments