Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedजीवनातील आईचे योगदान अविस्मरणीय ....! - ज्येष्ठ साहित्यिका चंद्रलेखा बेलसरे यांचे...

जीवनातील आईचे योगदान अविस्मरणीय ….! – ज्येष्ठ साहित्यिका चंद्रलेखा बेलसरे यांचे मत. स्व.सौ.उर्मिलाताई कराड आदर्श माता पुरस्कार प्रदान

 

 

पुणे, १९ मे : आई ही आपल्या आयुष्यातील पहिला गुरू असते. दिवस रात्र राबून,स्वत: झिजून आपल्या पाल्यांसाठी जीवाचे रान करते.आपण आयुष्यभर आईसाठी कितीही केले तरी तिचे उपकार फिटत नाहीत,असे मत ज्येष्ठ साहित्यिका मा.चंद्रलेखाताई बेलसरे यांनी व्यक्त केले.

अपेक्षा मासिक परिवार, पुणे यांच्या वतीने स्व.सौ.उर्मिलाताई कराड यांच्या जयंतीचे औचित्य साधून “स्व.सौ.उर्मिलाताई कराड आदर्श माता पुरस्कार ” प्रदान समारंभ वेदशास्त्रोतेजक सभागृह येथे संपन्न झाला. यावेळी अपेक्षा मातृसेवा विशेषांकाचे प्रकाशन आणि निमंत्रित कवींच्या कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेविका देवयानीताई वैदानकर, सौ.मीनाताई सत्यशील नाईक, मायाताई प्रभूणे व श्री.रामहरी कराड-रुईकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात सीताबाई नरके,सुनेत्रा गायकवाड, श्रध्दा सिंदगीकर, निर्मला बाचल, प्रमिला विश्वे, स्नेहा मुसरीफ, मंजू महाबळेश्वरकर, वैदेही भोमे, सरिता बक्षी,ज्योती सिनफळ रूपा करडखेडकर, मंगला कुमावत, प्राची देशपांडे यांना स्व.सौ.उर्मिलाताई कराड आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आले.पुरस्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना सौ.श्रध्दा सिंदगीकर यांनी उर्मिलाताई कराड यांच्या आठवणींना उजाळा दिला.

कविसंमेलनात अस्मिता मराठे, गणेश पुंडे, सीमा माने, ज्योती मनोहर, पुष्पा कुलकर्णी, अंजली महाजन, प्रकाश नाईक यांनी सादर केलेल्या आईवरील कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

कार्यक्रमाचे आयोजक अपेक्षा मासिकाचे संपादक श्री. दत्तात्रय उभे यांनी प्रास्ताविक केले. श्री.राजेंद्र सगर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments