Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वच्छ पिंपरी-चिंचवडसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा – महापौर रवि लांडगे पिंपळे गुरव...

स्वच्छ पिंपरी-चिंचवडसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा – महापौर रवि लांडगे पिंपळे गुरव येथे भव्य स्वच्छता अभियान; २ हजार किलोहून अधिक कचरा संकलित

 

पिंपरी, दि. ३१.०५.२०२६ : स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन राबविलेले स्वच्छता उपक्रम शहरासाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी केले.

 

पिंपळे गुरव येथील पीडब्ल्यूडी मैदान ते डायनासोर गार्डन परिसरात वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड असोसिएशन (WMSCOGA) यांच्या वतीने आयोजित स्वच्छता अभियान व पर्यावरण जनजागृती मोहिमेत महापौर रवि लांडगे यांनी सहभाग घेत स्वयंसेवकांचे कौतुक केले.

 

या उपक्रमात स्वयंसेवक, स्थानिक नागरिक तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागांमधील कचरा संकलित केला. मोहिमेदरम्यान सुमारे २ हजार किलोहून अधिक कचरा हटविण्यात आल्याने परिसर अधिक स्वच्छ व सुंदर झाला.

 

यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले की, “स्वच्छता ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या संयुक्त सहभागातूनच स्वच्छ व हरित पिंपरी-चिंचवडची संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकते. भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी वातावरण देण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”

 

स्वच्छता मोहिमेबरोबरच पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि हवामान बदल याविषयी जनजागृती करण्यात आली. स्वयंसेवकांनी नागरिकांशी संवाद साधून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला.

 

महापौरांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन करत भविष्यातही अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांना महानगरपालिकेचे सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही दिली.

 

या यशस्वी उपक्रमामुळे नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या समन्वयातून शहर स्वच्छता चळवळीला नवी ऊर्जा मिळाली असून स्वच्छ व हरित पिंपरी-चिंचवडच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचल

ले गेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments