पुणे, दि.६ : कोथरूड वाहतूक विभाग अंतर्गत महादेव मंदिर चौकातून नदीपात्राकडे जाणारा दुतर्फा रस्त्यावर दररोज सायंकाळी पाच ते आठ दरम्यान नदीपात्राकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी करण्यात येत आहे. या कालावधीत नदीपात्राकडून महादेव मंदिर चौकात येणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात येत आहे.
नागरिकांनी वाहतुकीतील बदल लक्षात घेऊन महादेव मंदिर चौकातून डावीकडे वळून पाडळे पॅलेस सर्कल येथून उजवीकडे वळण घेऊन पुढे शारदा सेंटर मार्गे स्थळे जावे. किंवा महादेव मंदिर चौकातून उजवीकडे वळण घेऊन बालाजी इंटरप्राईजेस लेन येथून डावीकडे वळण घेऊन इच्छित स्थळी जावे,असे आवाहन पोलीस उप आयुक्त संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
०००


