Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्व. गुरुवर्य निवृत्ती नारायण मारणे (वस्ताद) पथ नामकरण सोहळा गुरुवारी (दि.४) कुंजीर...

स्व. गुरुवर्य निवृत्ती नारायण मारणे (वस्ताद) पथ नामकरण सोहळा गुरुवारी (दि.४) कुंजीर तालीम मित्रपरिवार आणि मारणे परिवार वतीने आयोजन

पुणे : कुंजीर तालीम मित्रपरिवार आणि मारणे परिवाराच्या वतीने स्व. गुरुवर्य निवृत्ती नारायण मारणे (वस्ताद) पथ नामकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दिनांक ४ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता हा सोहळा छत्रपती शिवाजीनगर मध्ये कुशल वॉल स्ट्रीट शेजारी, नामदार गोपाळकृष्ण गोखले पथावरून आपटे रस्त्याला जोडणारा (फर्ग्युसन कॉलेज रस्ता) येथे होणार आहे, अशी माहिती आयोजक डॉ. रामदास निवृत्ती मारणे आणि शाम निवृत्ती मारणे यांनी दिली.

 

नामफलकाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते होणार असून, ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. कार्यक्रमात मोठ्या संख्येने कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

स्व. गुरुवर्य निवृत्ती नारायण मारणे (वस्ताद) हे मुळशी तालुक्यातील उरवडे आंबेगाव या एका छोट्या खेड्यातून व्यायामाच्या वेड्याने कुस्तीच्या आवडीमुळे पुण्यात आले आणि त्यांचे चुलते बापूसाहेब मारणे यांनी त्यांना एकदा वाघाच्या बछड्याने वाघा सारखे असावे असे सांगितले तो शब्द त्यांच्या जिव्हारी लागला आणि त्यांनी त्या जिद्दीने व्यायामाला सुरुवात केली. बघता बघता त्यांनी अनेक मैदान मारली गावाकडील उरूस जत्रा येथील कुस्तीच्या फडावरती अनेक कुस्त्या चित्रपट केल्या त्यांचे नाव लवकिक झाले चांगले पैलवान देखील त्यांना लढत देण्यासाठी पुढे येत नव्हते. सन १९६१, १९६२ साली नागपूर ला सलग ते महाराष्ट्र चॅम्पियन राहिले. त्यांच्यामुळे कुमठेकर रस्त्यावरील कुंजीर तालमीतले कित्येक मल्ल उदयास आले. त्यांचे नाव छत्रपती शिवाजी नगर येथील एका मार्गाला देण्यात येत असून ही बाब पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातील सर्व पैलवान आणि कुस्तीप्रेमींच्या करता अभिमानाची आहे

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments