Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्षपदी श्री. सुधांशू रानडे यांची निवड

भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्षपदी श्री. सुधांशू रानडे यांची निवड

 

 

पुणे, दि. 1 जुन 2026 : भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाची प्रदेश पदाधिकारी बैठक पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते श्री. सुधांशू सुभाष रानडे यांची भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

 

श्री. रानडे हे व्यावसायिकदृष्ट्या मेकॅनिकल इंजिनिअर असून सध्या सोलापूर जनता सहकारी बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या श्री. रानडे यांनी सन 1997 ते 1999 या कालावधीत गोवा येथे संघ प्रचारक म्हणून कार्य केले आहे. भारतीय मजदूर संघाशी ते गेली 23 वर्षे सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी म्हणून जोडलेले आहेत.

 

त्यांनी भारतीय मजदूर संघाचे सोलापूर जिल्हा सचिव, सहकारी बँक कर्मचारी संघ सोलापूरचे सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. मार्च 2024 मध्ये पंढरपूर येथे झालेल्या भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनापासून ते प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

 

बैठकीत सह क्षेत्र संघटन मंत्री श्री. मोहन येणुरे यांनी अध्यक्षपदासाठी श्री. रानडे यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, नुकत्याच जगन्नाथ पुरी येथे संपन्न झालेल्या भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष तथा भारतीय मजदूर संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते श्री. अनिल ढुमणे यांची भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदात हा बदल करण्यात आला आहे.

 

यावेळी नवनिर्वाचित राष्ट्रीय सचिव श्री. अनिल ढुमणे यांनी श्री. सुधांशू रानडे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

निवड जाहीर झाल्यानंतर आपल्या मनोगतात श्री. सुधांशू रानडे म्हणाले, “भारतीय मजदूर संघाचा राष्ट्रवादी, कामगारहितवादी आणि समाजाभिमुख विचार तळागाळातील कामगारांपर्यंत पोहोचवून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक जीवनासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.”

 

यावेळी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री श्री. किरण मिलगीर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

 

भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने श्री. सुधांशू रानडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. अशी माहीती मिडीया प्रभारी सागर पवार यांनी दिली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments