Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedसायबर क्राईम वरील कादंबरीचे दि. ७ रोजी शोध पत्रकार सुचेता दलाल...

सायबर क्राईम वरील कादंबरीचे दि. ७ रोजी शोध पत्रकार सुचेता दलाल यांच्या हस्ते प्रकाश न

सध्या अतिशय संवेदनशील असलेल्या सायबर फसवणूक / सायबर फ्रॉड या विषयावर आधारित “Everything is Fair” या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता काळे सभागृह, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स, बी.एम.सी.सी. मार्ग पुणे येथे संपन्न होत आहे. कादंबरी स्वरूपातील या पुस्तकाचे प्रकाशन पद्मश्री व अर्थजगतातील अग्रणी शोध पत्रकार सुचेता दलाल (मुंबई) यांच्या हस्ते होणार आहे. खा. डॉ. मेधा कुलकर्णी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.

 

या पुस्तकाचे लेखक शशांक सदाशिव वाघ हे ज्येष्ठ बँकर, आय. बी. ए. पुरस्कारप्राप्त लेखक आणि बँकिंग-वित्त विषयावरील नियमित लेखक आहेत. सायबर तपास तज्ज्ञ व प्रसिद्ध यूट्यूबर डॉ. धनंजय देशपांडे यांची प्रस्तावना या पुस्तकास लाभली आहे. ‘मानव्य’ संस्थेचे विद्यार्थी या प्रसंगी विशेष संस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. हा कार्यक्रम यूट्यूब वर लाईव्ह असणार आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments