Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगने भारतात आणली २०२६ व्हिजन एआय टीव्ही श्रेणी; मायक्रो आरजीबी, ओएलईडी, निओ...

सॅमसंगने भारतात आणली २०२६ व्हिजन एआय टीव्ही श्रेणी; मायक्रो आरजीबी, ओएलईडी, निओ क्युएलईडी, द फ्रेम, मिनी एलईडी आणि युएचडी टीव्हीचे ७२ मॉडेल्स लाँच

गुरुग्राम, भारत – मे २७, २०२६ – सॅमसंग इंडियाने आज आपल्‍या संपूर्ण २०२६ व्हिजन एआय टीव्ही लाइनअपच्‍या लाँचची घोषणा केली. या लाइनअपमध्‍ये मायक्रो आरजीबी, ओएलईडी, निओ क्युएलईडी, द फ्रेम, मिनी एलईडी आणि युएचडी टीव्हीचा समावेश आहे. आज या लाँचसह सॅमसंग आपल्या सर्व मॉडेल्समध्ये एआय-समर्थित वैशिष्ट्यांचा विस्तार करत आहे, तसेच भारतातील अधिकाधिक ग्राहकांसाठी अधिक स्मार्ट पिक्‍चर, साऊंड आणि वैयक्तिकृत व्‍युईंग अनुभव घेऊन येत आहे. सॅमसंग सलग २० वर्षांपासून जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकाचा टीव्ही ब्रँड आहे.

सॅमसंगच्या ४के आणि त्यावरील टीव्ही श्रेणीमध्ये व्हिजन एआय कम्पॅनियन (व्‍हीएसी) वैशिष्ट्यांच्या झालेल्‍या या विस्‍तारीकरणामधून एआय- तंत्रज्ञानाला टीव्ही अनुभवाचा मुख्य भाग बनवण्याप्रती ब्रँडचे व्‍यापक धोरण दिसून येते. या विस्तारामुळे एआय-आधारित व्‍युईंग अनुभव अधिक श्रेणी, स्क्रीन आकार आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध झाला आहे.

“आमची व्हिजन एआय टीव्हीची नवीन श्रेणी स्थानिक कन्टेंट प्लॅटफॉर्म्सना विनासायासपणे जोडते, बहुभाषिक सपोर्ट वाढवते आणि भारतातील व्‍यक्तींच्‍या वैविध्यपूर्ण जीवनशैलीसाठी ऊर्जा-बचत करणारे पर्याय उपलब्ध करून देते,” असे सॅमसंग इंडियाच्या व्हिज्युअल डिस्प्ले बिझनेसचे उपाध्यक्ष विप्लेश डांग म्हणाले.

 

 

व्हिजन एआय कम्पॅनियनमुळे मिळणार अधिक स्मार्ट आणि सर्वोत्तम व्‍युईंग अनुभव

या एआय टीव्‍ही लाइनअपमध्‍ये चित्रपट, क्रीडा आणि गेमिंगसाठी एआय-वर्धित मनोरंजनाची वैशिष्ट्ये देखील आहेत.

एआय अपस्केलिंग प्रो रिअल टाइममध्ये कमी-रिझोल्यूशनच्या कन्टेंटचे विश्‍लेषण आणि सुधारणा करण्यासाठी एआयचा वापर करते. ज्यामुळे अधिक तपशील, खोली आणि कॉन्ट्रास्ट मिळतो, तर कलर बूस्टर प्रो अधिक वैविध्‍यपूर्ण व वास्‍तविक रंगसंगती प्रदान करण्यासाठी दृश्यांचे विश्‍लेषण आणि वर्गीकरण करते.

एआय सॉकर मोड चेंडूची सुलभ हालचाल, वैविध्‍यपूर्ण रंगसंगती आणि स्टेडियममधील सर्वोत्तम ऑडिओचा अनुभव देण्यासाठी रिअल टाइममध्ये सामन्याच्या दृश्यांचे विश्‍लेषण करून पिक्‍चर व साऊंडमध्‍ये सुधारणा करतो.

एआय साऊंड कंट्रोलर प्रो रिअल टाइममध्ये संवाद, पार्श्वभूमी संगीत आणि साऊंड इफेक्‍ट्सचे विश्‍लेषण करतो, ज्यामुळे ग्राहकांना अधिक सर्वोत्तम अनुभवासाठी कॉमेंट्री आणि प्रेक्षकांचा आवाज यांसारखे घटक सोयीनुसार बदलता येतात.

मायक्रो आरजीबी: प्रीमियम पिक्‍चर क्‍वॉलिटीच्‍या भविष्याला नवी व्याख्या देणारा

भारतात मायक्रो आरजीबीच्या पदार्पणामुळे सॅमसंगचा प्रीमियम टीव्ही अनुभव स्क्रीन आकाराच्या अधिक विस्तृत श्रेणीमध्ये विस्तारला आहे; ज्यामुळे अधिक ग्राहकांसाठी अत्यंत अचूक रंग, ब्राइटनेस आणि सर्वोत्तम एआय-समर्थित व्‍युईंग अनुभव उपलब्ध झाला आहे. ५५ ते ११५ इंच आकारातील आर९५एच आणि आर८५एच सिरीजमध्ये उपलब्ध असलेले मायक्रो आरजीबी सॅमसंगच्या मालकीच्या मायक्रो आरजीबी तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे अत्यंत अचूक प्रकाश नियंत्रण, अधिक समृद्ध तपशील आणि अधिक नैसर्गिक रंग प्रदान करण्यासाठी स्वतंत्रपणे नियंत्रित केलेल्या लाल, हिरव्या आणि निळ्या मायक्रो एलईडीचा वापर करते.

ओएलईडी: अधिक व्‍युईंग आवडीनिवडींसाठी श्रेणीचा विस्तार

सॅमसंगच्या २०२६ ओएलईडी टीव्हीमध्ये एस९५एच, एस९०एचआणि एस८५एचचा समावेश आहे, जे टीव्‍ही पाहण्याच्या अधिक विस्तृत आवडीनिवडींमध्ये गडद काळा रंग, समृद्ध रंग, सर्वोत्तम कार्यक्षमता आणि उत्कृष्ट डिझाइन देतात. ग्लेअर-फ्री तंत्रज्ञान, जे आधी फक्त एस९५ मॉडेलवर उपलब्ध होते, आता एस९५एच आणि एस९०एच या दोन्ही मॉडेल्सवर विस्तारले आहे, जे अगदी उजळ प्रकाश असलेल्या रूममध्‍ये देखील डिस्प्लेचा खरा काळा रंग आणि समृद्ध रंग स्पष्ट व विनाअडथळा राहण्यास मदत करते.

द फ्रेम: आर्ट टीव्ही अनुभवाला अधिक उंचावणारा

द फ्रेम श्रेणी विशेषतः कलाप्रेमींसाठी डिझाइन करण्यात आली आहे. द फ्रेमची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

मॉडर्न फ्रेम डिझाइन: कलेचा एक उत्कृष्ट नमुना असलेला सॅमसंग फ्रेम टीव्ही स्टाइल आणि कार्यक्षमतेचे अद्वितीय संयोजन आहे, ज्यामुळे लिव्हिंग रूमचे अत्याधुनिक गॅलरीमध्ये रूपांतर होते.

क्युएलईडी पिक्चर क्‍वॉलिटी: हा टीव्ही अगदी उजळ प्रकाश असलेल्या रूममध्‍ये देखील समृद्ध कॉन्ट्रास्ट, वास्‍तविक व कागदासारखी रंगसंगती आणि अधिक स्पष्ट तपशील प्रदान करतो.

निओ क्युएलईडी: अधिक कनेक्टेड अनुभवांसह सुधारित पिक्‍चर क्‍वॉलिटी

सॅमसंगची निओ क्युएलईडी लाइनअप क्युएन८०एच आणि क्युएन७०एचमध्ये सुधारित पिक्‍चर क्‍वॉलिटी आणि अधिक कनेक्टेड व्‍युईंग अनुभव एकत्र घेऊन येते. प्रत्येक मॉडेल खऱ्या निओ क्युएलईडी अनुभवाकडून अपेक्षित असलेला ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट आणि स्मार्ट ऑप्टिमायझेशन प्रदान करते.

मिनी एलईडी: एआयसाठी अनुकूल, अधिक सुलभ बनवलेला

सॅमसंग मिनी एलईडी अधिकाधिक प्रेक्षकांसाठी अधिक उजळ आणि समृद्ध व्‍युईंग अनुभव घेऊन येतो. एम८०एच आणि एम७०एच या दोन वेगवेगळ्या मॉडेल्ससह सॅमसंग मिनी एलईडी आणि एआय-समर्थित व्‍युईंग अनुभव अधिकाधिक ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहे.

किंमत, ऑफर्स आणि उपलब्धता

निवडक टीव्ही मॉडेल्सच्या खरेदीवर ग्राहकांना १०२९९० रुपये किमतीचा मोफत साऊंडबार आणि २३९९० रुपये किमतीचा मोफत म्युझिक स्टुडिओ मिळेल. याव्यतिरिक्त, खरेदी अधिक फायदेशीर करण्यासाठी २० टक्‍क्‍यांपर्यंत कॅशबॅक आणि स्थिर ईएमआय पर्यायांचा आनंद घ्या. ही २०२६ लाइनअप आजपासून सॅमसंग रिटेल स्टोअर्स, Samsung.com आणि आघाडीच्या ऑफलाइन व ऑनलाइन रिटेल चॅनल्सवर उपलब्ध होईल.

सॅमसंगच्या मायक्रो आरजीबी श्रेणीची किंमत १२४९९० रुपयांपासून सुरू होते.

सॅमसंगच्या ओएलईडी श्रेणीची किंमत ११४९९० रुपयांपासून सुरू होते.

सॅमसंगच्या फ्रेम टीव्ही श्रेणीची किंमत ५६९९० रुपयांपासून सुरू होते.

सॅमसंगच्या निओ क्युएलईडी श्रेणीची किंमत ५२९९० रुपयांपासून सुरू होते.

सॅमसंगच्या मिनी एलईडी श्रेणीची किंमत ४२९९० रुपयांपासून सुरू होते.

सॅमसंगच्या युएचडी टीव्ही श्रेणीची किंमत ३६९९० रुपयांपासून सुरू होते.

*****

*****************************

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments