Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्कोडा आँटोच्या फॉक्सवॅगन ब्रँडचे श्रीलंकेत दमदार पदार्पण  पुणे प्रकल्पातून उत्पादित टायगून,...

स्कोडा आँटोच्या फॉक्सवॅगन ब्रँडचे श्रीलंकेत दमदार पदार्पण  पुणे प्रकल्पातून उत्पादित टायगून, व्हर्टस सेडानची श्रीलंकेत एन्ट्री 

 

पुणे | १ जून 2026: स्कोडा ऑटो फॉक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SAVWIPL) ने आज श्रीलंकेत फॉक्सवैगन ब्रँडची एन्ट्री जाहीर केली. कॉन्टिनेंटल कार्स अँड कमर्शियल्स लिमिटेड सोबतच्या भागीदारीत हा महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून, कंपनीच्या प्रादेशिक वाढीच्या प्रवासाला नवी दिशा मिळाली आहे आणि बाजारपेठेसाठी दीर्घकालीन बांधिलकी अधिक मजबूत झाली आहे.

फॉक्सवैगन ब्रँड श्रीलंकेत दोन जागतिक स्तरावर प्रशंसित मॉडेल्ससह दाखल होत आहे फॉक्सवैगन टायगुन एसयूव्ही आणि व्हर्टस सेडान. यामध्ये युरोपियन दर्जाचे प्रॉडक्ट्स, मजबूत सेफ्टी क्रेडेन्शियल्स आणि प्रीमियम मालकीचा अनुभव एकत्रितपणे ग्राहकांना मिळणार आहे. विक्री आणि आफ्टर-सेल्स सर्व्हिसच्या जागतिक दर्जाच्या सपोर्टसह हे मॉडेल्स श्रीलंकेतील ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. दोन्ही मॉडेल्स SAVWIPL च्या पुण्यातील अत्याधुनिक चाकण प्लांटमध्ये तयार केले जातात आणि जगभरातील बाजारपेठेत निर्यात केली जातात. हे कंपनीच्या “मेड इन इंडिया फॉर इंडिया अँड द वर्ल्ड” या धोरणाची ताकद दाखवते आणि भारतातून जागतिक स्तरावर प्रीमियम वाहनांची पुरवठा क्षमता अधोरेखित करते.

या प्रसंगी बोलताना स्कोडा ऑटो फॉक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष अरोरा म्हणाले, “श्रीलंका हा ऑटोमोबाईल्सबद्दल प्रचंड आवड असलेली बाजारपेठ आहे आणि दर्जेदार इंजिनिअरिंगची खरी कदर करणारा देश आहे. फॉक्सवैगनची एन्ट्री ही केवळ आमच्या उपस्थितीचा विस्तार नाही, तर भारताबाहेर दीर्घकालीन शाश्वत वाढ साधण्यासाठी आमच्या स्केल, लोकलायझेशन आणि इंजिनिअरिंग क्षमतांचा उपयोग करण्याच्या धोरणाचा भाग आहे. कॉन्टिनेंटल कार्स अँड कमर्शियल्स लिमिटेड सोबत आम्ही टायगुन एसयूव्ही आणि व्हर्टस सेडानसह श्रीलंकेत फॉक्सवैगन सादर करताना अभिमान वाटतो. आमचा फोकस विश्वासार्हता, ग्राहक-केंद्रितता आणि मजबूत सर्व्हिस सपोर्टसह प्रीमियम मालकीचा अनुभव देण्यावर आहे.”

स्कोडा ऑटो फॉक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे सेल्स, मार्केटिंग आणि डिजिटल विभागाचे कार्यकारी संचालक जान बुरेस म्हणाले, “टायगुन आणि व्हर्टसद्वारे आम्ही श्रीलंकेतील प्रीमियम पॅसेंजर व्हेईकल मार्केटमधील स्पष्ट ग्राहक पसंतीला प्रतिसाद देत आहोत. आमचा फोकस योग्य प्रॉडक्ट मिक्स, मजबूत रिटेल उपस्थिती आणि विश्वासार्ह आफ्टर-सेल्स अनुभव यावर आहे, ज्यामुळे ग्राहकांना पहिल्या दिवसापासून आत्मविश्वास मिळेल. हे केवळ दक्षिण आशियातील आमचे क्षितिज विस्तारण्याबद्दल नाही, तर दीर्घकालीन शाश्वत वाढीसाठी मजबूत पाया तयार करण्याबद्दल आहे.”

कॉन्टिनेंटल कार्स अँड कमर्शियल्स लिमिटेड, श्रीलंकेतील प्रीमियम ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनुभवी कंपनी, फॉक्सवैगन ब्रँडच्या एन्ट्रीला बाजारात सपोर्ट करत आहे. ब्रँड लॉन्चचा भाग म्हणून, SAVWIPL आणि कॉन्टिनेंटल कार्स अँड कमर्शियल्स लिमिटेड यांनी श्री जयवर्धनेपुरा कोट्टे येथे जागतिक दर्जाचे 3S सुविधा केंद्र सुरू केले आहे जे कोलंबोतील सर्वात प्रतिष्ठित निवासी भागांपैकी एक आहे. या नवीन फॉक्सवैगन शो-रूममध्ये 18,713 चौ. फूट बांधकाम क्षेत्र, जवळपास एक एकर जागा आणि 20 हून अधिक सर्व्हिस बे आहेत. ग्राहकांना विक्री, सर्व्हिस आणि स्पेअर्सचा संपूर्ण अनुभव एका छताखाली मिळावा यासाठी हे केंद्र खास डिझाइन केले गेले आहे.

फॉक्सवैगनची श्रीलंकेत एन्ट्री अशा वेळी होत आहे जेव्हा बाजार स्थिरतेकडे आणि पुनर्प्राप्तीकडे वाटचाल करत आहे. प्रीमियम मोबिलिटीबद्दल ग्राहकांचा रस वाढत आहे आणि यामुळेच फॉक्सवैगन ब्रँडला योग्य संधी मिळत आहे. श्रीलंका लॉन्च हे SAVWIPL च्या दीर्घकालीन व्हिजनचे प्रतिबिंब आहे, ज्यामध्ये कंपनी फॉक्सवैगन ग्रुपसाठी प्रादेशिक उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत करत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अधिक माहितीसाठी:

सरमद कादिरी गुरलीन कौर

हेड – एक्स्टर्नल कम्युनिकेशन्स द पॉपकॉर्न

स्कोडा ऑटो फॉक्सवैगन इंडिया gurleen@thepopkorn.com

sarmad.kadiri@skoda-vw.co.in

 

स्कोडा ऑटो फॉक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड: (SAVWIPL)

याचे मुख्यालय पुण्यात आहे. हे फॉक्सवैगन समूहाच्या सहा ब्रँड्स — स्कोडा, फॉक्सवैगन, ऑडी, बेंटले, लॅम्बोर्गिनी आणि पोर्श — यांच्या भारतीय ऑपरेशन्सचे व्यवस्थापन करते;

याने 25 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर (पूर्वी औरंगाबाद) येथून भारतातील आपली यात्रा सुरू केली होती आणि आज हे पुण्याच्या चाकनसह दोन उत्पादन केंद्रे चालवते, ज्यांची एकूण वार्षिक क्षमता 315,000 युनिट्स आहे;

“मेड इन इंडिया फॉर इंडिया अँड द वर्ल्ड” या दृष्टिकोनाखाली हे एक महत्त्वाचे निर्यात केंद्र म्हणून कार्य करते, जिथे 40+ देशांमध्ये 700,000 पेक्षा जास्त गाड्या पाठवल्या जातात;

2025 मध्ये 2 मिलियन स्थानिक गाड्यांचा टप्पा पार केला, जो भारतातील समूहासाठी एक मोठा मैलाचा दगड ठरला;

इंडिया 2.0 प्रोजेक्ट आणि भारतीय ग्राहकांसाठी समूहाची पहिली सब-4-मीटर SUV याच्या माध्यमातून स्थानिकीकरण अधिक मजबूत केले आणि पुरवठादार इकोसिस्टमला बळकटी दिली;

स्थानिक पातळीवर तयार केलेले मॉडेल्स — स्कोडा काइलाक, कुशाक, स्लाविया, फॉक्सवैगन टायगुन आणि वर्टस — यांनी मिळून एकत्रितपणे 2025 मध्ये 5,50,000 युनिट्सचा टप्पा पार केला;

देशभरातील जवळपास 700 ग्राहक टचपॉइंट्सच्या सहाय्याने, विविध सेगमेंट्समध्ये एक मोठे पोर्टफोलिओ देते;

कंपनीत 4,000 हून अधिक कर्मचारी कार्यरत असून, सलग तीन वर्षे ‘टॉप एम्प्लॉयर’, आणि एचआर एशिया च्या ‘बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर इन एशिया’ म्हणून मान्यता मिळाली आहे. तसेच, ET HC MENA कडून सलग दोन वर्षे गौरव प्राप्त झाला आहे.

भारत आणि जागतिक बाजारपेठांसाठी ICE आणि BEV तंत्रज्ञानामध्ये शाश्वत मोबिलिटी, व्यावहारिक नवकल्पना आणि संतुलित दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करत राहते.

SAVWIPL बद्दल अधिक वाचण्यासाठी, कृपया www.sk

oda-vw.co.in येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments