Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रीडा विकासासाठी सरकार कटीबद्ध- मेधा कुलकर्णी   खेळाडूंच्या आयुष्यात मातांचा मोठा वाटा-...

क्रीडा विकासासाठी सरकार कटीबद्ध- मेधा कुलकर्णी   खेळाडूंच्या आयुष्यात मातांचा मोठा वाटा- राज चौधरी 

क्रीडा भारतीच्या जिजामाता पुरस्कारांचे अतिशय उत्साहात वितर

पुणे दिनांक २ जून २०२६

खेळाडू घडविताना त्याच्या पालकांना विशेषतः त्याच्या आईला खूप संघर्ष करावा लागतो खस्ता खायला लागतात पण त्यांच्या या संघर्षामुळेच देशाला अव्वल दर्जाचे खेळाडू लाभतात असे संसद रत्न पुरस्कार विजेत्या खासदार सौ. मेधा कुलकर्णी तसेच क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी यांनी सांगितले. निमित्त होते क्रीडाभारतीच्या जिजामाता पुरस्कार वितरण समारंभाचे. हा समारंभ अतिशय उत्साहात पार पडला.

 

// 2 //

 

// 2 //

खेळाडूंच्या यशामध्ये त्यांच्या आई-वडिलांचा सिंहाचा वाटा असतो हे लक्षात घेऊनच क्रीडा भारतीतर्फे दरवर्षी खेळाडूंच्या मातांचा ‘जिजामाता सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बाल शिक्षण मंदिरच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास क्रीडा भारतीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय पुरंदरे , पुणे महानगर अध्यक्ष विनायक बापट, तसेच अर्जुन पारितोषिक विजेते शांताराम जाधव, शकुंतला खटावकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे हे उपस्थित होते. मेधा कुलकर्णी यांना या समारंभाच्या वेळी केंद्रीय समितीची बैठक असल्यामुळे त्यांनी ऑनलाईन पद्धती द्वारे या समारंभात सहभाग घेतला आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर गेल्या बारा वर्षांमध्ये केंद्र सरकारने क्रीडा क्षेत्रासाठी अनेक योजना अमलात आणल्या आहेत. खेळाडूच्या विकासासाठी केंद्र सरकार नेहमीच कटिबद्ध आहे असे सौ. कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले

या समारंभामध्ये रीना गुप्ता (गीता गुप्ता), राजश्री गुगळे (संगीता गुगळे), अक्षय बोरगावकर (मनीषा बोरगावकर), महेंद्र गोकुळे (मंगला गोकुळे), श्रेया नानकर (मंजुषा नानकर), ऋतुजा भोसले (नीता भोसले), चंद्रिका पुजारी (योगिता पुजारी), गौरी रेवाळे (प्रतिभा रेवाळे), लोकेश भोसले (वंदना भोसले), साक्षी माथवड (अर्चना माथवड), अनन्या फडके (गौतमी फडके) या खेळाडूंच्या मातांचा सत्कार केला जाणार आहे. उदयोन्मुख खेळाडूंमध्ये निषाद नरवणे, शरण्या देवकर, निधी गायकवाड, अविरत चौहान, अद्वैत बापट , आर्यन प्रजापती, शौरेन सोमण, प्रणाली बाराते, हंसिका पाटील, रितिका इंगलगावकर, अद्वय गोळे तसेच पारलिंगी खेळाडू मिलिंद (मिलन) दत्तात्रय लबडे यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

प्रत्येक व्यक्तीचे जीवन निरोगी व्हावे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून क्रीडाभारती देशाच्या कानाकोपऱ्यात क्रीडा विकासाचे काम करीत आहे. प्रत्येक खेळाडूने भारतीय संस्कृती जपण्याचे ही काम करावे या दृष्टीनेच क्रीडा भारती विशेष प्रयत्न करीत असते असे चौधरी यांनी यावेळी सांगितले.

क्रीडा भारतीचे प्रांत मंत्री हरीश अनगोलकर यांनी संडे ऑन सायकल या मोहिमेविषयी माहिती देत प्रत्येकाने सायकल चालवावी असे आवाहन केले. विनायक बापट यांनी प्रास्ताविक केले विजय रजपूत यांनी आभार मानले. राजश्री शिंदे यांनी सूत्रसंचा

लन केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments