Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाजपा च्या संघर्ष काळातील "गोपीनाथराव मुंडे साहेब हे मोठ्या मनाचे उत्तुंग नेतृत्व"...

भाजपा च्या संघर्ष काळातील “गोपीनाथराव मुंडे साहेब हे मोठ्या मनाचे उत्तुंग नेतृत्व” – संदीप खर्डेकर.

 

 

“साहेबांच्या” पुण्यतिथी निमित्त वृंदावन शैक्षणिक प्रकल्पास क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विविध वस्तू भेट.

 

भारतीय जनता पार्टीच्या संघर्षाच्या काळातील मोठ्या मनाचे व उत्तुंग नेतृत्व म्हणून गोपीनाथराव मुंडे साहेब सदैव स्मरणात राहतील अश्या शब्दात संदीप खर्डेकर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 2002/2003 च्या चांदा ते बांदा ह्या संघर्ष यात्रेदरम्यान अनुभवलेले मुंडे साहेब यांच्या अनेक आठवणी सांगता येतील मात्र मुंबईतील गुन्हेगारी विरुद्ध, नक्षलवाद्यावर कठोर कारवाई करणारे कणखर साहेब हे वैयक्तिक जीवनात तितकेच हळवे होते हे वेगळेपण विसरता येणार नाही. गोर गरीब व शेतकऱ्यांप्रती कणव असणारे मुंडे साहेब हे संवेदनशील नेतृत्व होते व कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे आणि त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणारे लोकनेते होते असेही संदीप खर्डेकर म्हणाले.

आज गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त सेवाव्रत फाउंडेशन संचालित वृंदावन शैक्षणिक प्रकल्पा अंतर्गत कर्वेनगर च्या कामना वसाहत, वारजे च्या म्हाडा वसाहत आणि पानमळा वसाहतीतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे शैक्षणिक व क्रीडा साहित्य भेट देण्यात आले त्या प्रसंगी खर्डेकर यांनी ह्या आठवणींना उजाळा दिला.या वेळी वस्तीतील मुलं पत्र्याच्या शेड मध्ये उकाड्यात अभ्यास करत असल्याचे लक्षात आल्यावर संदीप खर्डेकर यांनी शेड मध्ये गारवा रहावा यासाठी त्वरित कुलर भेट दिला.

या प्रसंगी नगरसेविका व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, सेवाव्रत फाउंडेशन चे संचालक प्रदीप देवकुळे, क्रिएटिव्ह चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर, सौ. प्रणेती लवंगे, पतित पावन संघटनेचे उपाध्यक्ष राहुल पडवळ, कोथरूड पतित पावन संघटनेचे विभाग प्रमुख अण्णा बांगर, श्री.अश्विन लवंगे, भाजपा महिला आघाडी सरचिटणीस कल्याणी खर्डेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुंडे साहेब हे सातत्याने सामान्यांच्या उत्कर्षाचा ध्यास घेतलेले लोकनेते होते त्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना ज्या घटकांकडे काही कमी आहे त्यांना मदत करावी असे क्रिएटिव्ह फाउंडेशन ने ठरविले असल्याचे विश्वस्त मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

सेवाव्रत फाउंडेशन वस्तीतील विद्यार्थ्यांसाठी निस्पृह वृत्तीने कार्यरत असून क्रिएटिव्ह फाउंडेशन ह्या प्रकल्पांना वेळोवेळी मदत करते याबद्दल प्रदीप देवकुळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे संयोजन विश्वस्त प्रतीक खर्डेकर व प्रणेती लवंगे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments