Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे मेट्रोतील कंत्राटी कामगारांना केंद्रीय वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय भारतीय मजदूर संघाच्या...

पुणे मेट्रोतील कंत्राटी कामगारांना केंद्रीय वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय भारतीय मजदूर संघाच्या संघर्षाला मोठे यश

पुणे, दि. २ जून २०२६ : पुणे मेट्रो रेल प्रकल्पामध्ये कार्यरत असलेल्या हजारो कंत्राटी कामगारांच्या न्याय्य वेतनाच्या मागणीस अखेर यश मिळाले असून महाराष्ट्र राज्याचे मा. कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुणे मेट्रोतील सर्व कंत्राटी कामगारांना केंद्रीय वेतनश्रेणीनुसार वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हा भारतीय मजदूर संघाच्या सातत्यपूर्ण आणि संघर्षशील प्रयत्नांचा मोठा विजय मानला जात आहे.
पुणे मेट्रो रेल कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून कंत्राटी कामगारांना न्याय्य वेतन मिळावे, केंद्र शासनाच्या लागू असलेल्या वेतनश्रेणीनुसार वेतन देण्यात यावे तसेच विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यात यावेत यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. यासाठी शासन, कामगार आयुक्त कार्यालय, पुणे मेट्रो प्रशासन तसेच संबंधित कंत्राटदार यांच्याशी अनेक बैठका, निवेदने व चर्चा करण्यात आल्या.
या आंदोलनाचा निर्णायक टप्पा म्हणून दि. १६ एप्रिल २०२६ रोजी भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये राज्यभरातील मोठ्या संख्येने कामगारांनी सहभाग घेतला होता. या व्यापक आंदोलनामुळे शासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले गेले आणि त्यानंतर झालेल्या सकारात्मक चर्चांमधून आजचा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला.
बैठकीदरम्यान केवळ वेतनवाढीच नव्हे तर थकीत वेतन फरकाची रक्कम (Arrears), वैधानिक सुविधांची अंमलबजावणी, कामगारांच्या सेवा अटी तसेच इतर प्रलंबित प्रश्नांबाबतही सकारात्मक चर्चा झाली. संबंधित प्रश्नांवर लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
कामगारांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल आणि प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल पुणे मेट्रो रेल कामगार संघ व भारतीय मजदूर संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मा. कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
या बैठकीस भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय सचिव श्री. अनिल ढुमणे, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री. किरण मिलगीर, पुणे जिल्हाध्यक्ष श्री. अर्जुन चव्हाण, पुणे मेट्रो रेल कामगार संघाचे अध्यक्ष श्री. राम सुरवसे, सौ. निकिता दंडवते, कैलास मोरे , महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष श्री. निलेश खरात, श्री. उमेश विश्वाद तसेच , पुणे मेट्रोतील कामगार पदाधिकारी उपस्थित होते . या बाबतीत पुणे मेट्रोतील सर्व कामगारांनी संघटित होऊन संघर्ष केला अशीच एकजूटीने पुढील काळात नोकरीत कायम सेवेत सामावून घेण्या बाबतीत प्रयत्नशील राहणार आहेत असे मनोगत अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस व पुणे मेट्रो रेल कामगार संघ जनरल सेक्रेटरी सचिन. मेंगाळे यांनी व्यक्त केले आहे .
भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या हक्कांसाठी सुरू असलेला हा संघर्ष पुढेही अधिक ताकदीने सुरू राहील, असे असा विश्वास सचिन मेंगाळे यांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मा संपादक
महोदय उपरोक्त वृत्त आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात यावेत ही विनंती
आपला
सचिन मेंगाळे
पुणे मेट्रो रेल कामगार संघ
(संलग्न – भारतीय मजदूर संघ)
9422037029
sachinmbms@gmail.com

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments