Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅट्सकडून बंगळुरूमध्ये आपल्या सर्वांत मोठ्या नावीन्यपूर्ण अन्न उपाययोजना सुविधेचे उद्घाटन, भारतात रेडी...

सॅट्सकडून बंगळुरूमध्ये आपल्या सर्वांत मोठ्या नावीन्यपूर्ण अन्न उपाययोजना सुविधेचे उद्घाटन, भारतात रेडी टू इट फूड युगाला प्रोत्साहन

भारत, १५ मार्च २०२४: भारतातील रेडी टू इट (आरटीई) अन्न उद्योगात अलीकडील कालावधीत मोठी वाढ झाली आहे. त्याची प्रमुख कारणे बदलती जीवनशैली, नागरीकरण आणि क्रय उत्पन्नात वाढ ही आहेत. सुलभता आणि वेळ वाचवणारे लाभ यामुळे आरटीईचे आहार व्यग्र शहरी ग्राहक, विद्यार्थी आणि नोकरदार व्यावसायिकांसाठी अत्यंत लोकप्रिय होऊ लागले आहेत. सॅट्सने भारतात २०२३ मध्ये रेडी आहाराच्या विक्रीचे मूल्य ५२ अब्ज अमेरिकन डॉलर[1] असल्याचे नमूद केले असून २०२६ पर्यंत ही विक्री ६४ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. २०२१ आणि २०२६ या कालावधीत त्याचे मूल्य ४५ टक्के दराने वाढेल. रेडी मील्समध्ये प्री-कूक्‍ड आणि रेडी टू इट स्वरूपात पॅक केलेल्या सर्व सुलभ अन्नांचा समावेश आहे. त्यासाठी प्रक्रिया किंवा शिजवणे केले गेलेले नाही. भारतातील अन्नप्रक्रिया उद्योग (एमओएफपीआय)नुसार तरूण ग्राहक आणि मिलेनियल्सचा समावेश असलेली ३४ टक्के भारतीय लोकसंख्या २०२८ पर्यंत जास्त आरटीई आहाराचे सेवन करेल. भारतीय आरटीई अन्नपदार्थांची जागतिक मागणी देखील देशांतर्गत मागणीपेक्षा जास्त वाढू लागली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही बाजारपेठांना सेवा देण्यासाठी सॅट्स फूड सोल्यूशन्स इंडिया (एसएफएसआय) या सॅट्स लि. (सॅट्स)ची पूर्णपणे मालकीच्या कंपनीने भारतातील बंगळुरूमध्ये आपली सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय अन्न उपाययोजना सुविधा सुरू केली आहे. ती सिंगापूर, चीन, जपान आणि थायलंडमधील विद्यमान मोठ्या अन्न सुविधांसाठी पूरक ठरेल.

सॅट्स इंडिया फूड सोल्यूशन्स (एसएफएसआय) सुविधेमध्ये ६१ दशलक्ष सिंगापूर डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. ती एक फ्रोजन फूड उत्पादन सुविधा असून त्यात पाककृतीचे ज्ञान, सर्वोच्च अन्न सुरक्षा मानकांनुसार स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून चविष्ट, पोषक अन्न पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. या उत्पादनांसोबतच अन्न उपाययोजना सुविधा नावीन्यपूर्णतेचा वापर करून सॅट्सच्या एक्स्पिरियन्स अँड इनोव्हेशन सेंटर्सचा भाग म्हणून पॅकेजिंग सुविधा देखील देईल.

बंगळुरूमधील केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टजवळ स्थित असलेल्या या सुविधेची व्याप्ती २२१,००० चौ. फूट असून त्यातून संस्थात्मक कॅटरिंग, खासगी लेबलिंग आणि भारत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील मोठ्या प्रमाणावरील अन्न रिटेलर्स, रेस्टॉरंट्स, क्लाऊड किचन्स, कॅफे आणि लाऊंजेससह इतर वाणिज्यिक ग्राहकांना दररोज ४०,००० किलो रेडी टू इट सुविधा देण्याची क्षमता आहे.

सॅट्स फूड सोल्यूशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्टॅन्ली गोह म्हणाले की, या सुविधेचे उद्घाटन हा आशियातील सॅट्स फूड उत्पादन नेटवर्कसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. “जागतिक दर्जाच्या एअरलाइन्स आणि वाणिज्यिक व सार्वजनिक संस्थांचे आशियातील आघाडीचे केटरर म्हणून आमचे ग्राहक सॅट्सवर तसेच आमच्या सिंगापूरमधील मध्यवर्ती किचनवर विश्वास ठेवतात, कारण फ्लाइट तसेच बाहेरदेखील मोठ्या प्रमाणावर उत्तम चवीचे दर्जेदार अन्नपदार्थ आम्ही देतो. वाणिज्यिक मार्ग आणि ग्राहकांच्या माहितीवर आधारित राहून आमच्या क्षमता मागच्या पाच दशकांमध्ये प्रचंड वाढल्या असून आम्ही त्यात खरेदीपासून ते मूल्यवर्धित प्रक्रिया, वाणिज्यिकरण आणि वितरण अशा संपूर्ण अन्नसाखळीचा समावेश केला आहे.”

“सिंगापूरपासून भारतात ही क्षमता आणि त्याचसोबत आमच्या भारतातील विमान केंद्री भागीदारांसोबत दीर्घकालीन संयुक्त विद्यमाद्वारे मिळालेले ज्ञान आम्ही आणत असून एसएफएसआय टीम उत्पादन डिझाइन, अन्न तंत्रज्ञान, संशोधन आणि विकासातील तसेच पॅकेजिंग नावीन्यपूर्णतेतील ज्ञानाचा वापर भारतातील मध्यवर्ती किचनमध्ये तयार केलेल्या अन्न उत्पादनांचे वितरण आणि निर्यात भारतात व परदेशात करण्यासाठी करतील.”

“आमची आशियातील अन्न उत्पादन सुविधा नवीन एसएफएसआय सुविधेच्या मदतीने आम्हाला दररोज ७५०,००० पेक्षा जास्त आहार देण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे आशिया आणि बाहेरील ग्राहकांच्या सॅट्स नेटवर्कला रेडी टू फूडसाठी मदत होईल आणि जास्तीत-जास्त लोकांना खाऊ घालून त्यांच्याशी जोडले जाण्याचा आमचा हेतू पूर्ण होऊ शकेल.”

“आज आम्हाला हे घोषित करताना आनंद होत आहे की, बंगळुरूस्थित स्विगी हा भारताचा आघाडीचा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आमच्या सॅट्स ग्राहक नेटवर्कमध्ये सहभागी होणारा पहिला ब्रँड आहे. त्यातून भारतभरात नावीन्यपूर्ण अन्न उपाययोजना देता येतील.”

स्विगीचे फूड मार्केटप्लेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर यांच्या मते: “आमचा विश्वास आहे की, एसएफएसआयमध्ये भारतात मोठ्या प्रमाणावर अन्न निर्मिती करण्यासाठी आघाडी घेण्याची क्षमता आहे. त्यांच्या अन्नपदार्थांचे ज्ञान आणि अन्न तंत्रज्ञानाची माहिती यांच्यामुळे अन्नसुरक्षा, अन्न दिसणे, पोषण चव या गोष्टीची खात्री मिळते आणि आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य देण्याच्या वचनाशी ते सुसंगत आहेत. आम्ही एकत्रितरित्या कशा रितीने काम करू शकतो याचे मार्ग शोधण्यासाठी उत्सुक आहोत.”

सॅट्स फूड सोल्यूशन्स इंडियाचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सागर दिघे म्हणाले की, ही कंपनी आपल्या जागतिक दर्जाच्या पाककला ज्ञानासाठी ओळखली जाते. तिने चविष्ट, पोषक आणि सुरक्षित अन्नपदार्थ देण्यासाठी सिद्ध झालेल्या अन्न तंत्रज्ञानाचा वापर करून ऑथेंटिक चव देखील दिली आहे.

“अन्नसुरक्षा, एकात्मता आणि दर्जा या गोष्टी सॅट्स किचनमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आणि आम्ही एफएसएसएआय हे भारतीय दर्जा मानक प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणने जसे एफडीए, सीएफआयए, एफएसएससी२२०००, अन्न सुरक्षा व्यवस्थापन यंत्रणा (एफएसएमएस) आणि मेदिना यांची पूर्तता आता आमच्या इततर किचन्ससोबत सातत्यपूर्णता राखण्यासाठी पूर्ण केली जात आहेत.

“आम्ही इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) सारख्या उद्योगात सिद्ध झालेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्या टीम्सना अन्न सुरक्षा आणि दर्जा सर्वोच्च दर्जाच्या असतील याची काळजी घेतानाच किचनच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी सक्षम केले आहे,” असे सागर म्हणाले.

उदाहरणार्थ, इंटरनेट-ऑफ-थिंग्ज (आयओटी) सेन्सर्स आणि सेन्सर-आधारित लाइटिंग सिस्टीम रिअल-टाइममध्ये ऊर्जा वापराचे परीक्षण आणि संरक्षण करण्यासाठी सुविधेमध्ये स्थापित केले गेले आहेत. हे आयओटी-संचालित सेन्सर सुविधेचे सभोवतालचे तापमान, आर्द्रता, हवेची गुणवत्ता आणि कोल्ड स्टोअर्स आणि कुकिंग स्टेशन यांसारख्या सुविधेतील उपयुक्तता, अन्नाची चव आणि सुरक्षितता तपासण्यासाठी निरीक्षण करतात. आयओटी पूर्व-प्रोग्राम केलेल्या स्वयंपाक प्रक्रियेचे थेट डॅशबोर्डद्वारे परीक्षण करता येते. स्वयंपाकाच्या वेळा आणि तापमानाच्या सेटिंग्ज पूर्व-निश्चित पाककृतींमधून बदलल्यास अलर्ट आपोआप दाबले जातात. आयओटी सेन्सरचा वापर करून कच्चे पदार्थ आणि शिजवलेले अन्न विशिष्ट तापमानात साठवले जाते. त्यामुळे अन्न सुरक्षा, उच्च-गुणवत्ता, चव आणि पोत याची खात्री मिळते.

फूड फॅसिलिटी तंत्रज्ञानाचा वापर धोक्यांचा अंदाज लावण्यासाठी, उत्पादनातील प्रमुख घटकांची शोधक्षमता आणि पारदर्शकता सुधारण्यासाठी व डेटाची विश्वासार्हता वाढवण्यासाठी देखील केला जातो. उदाहरणार्थ, अन्न उत्पादनाच्या शेतातून टेबलापर्यंतच्या प्रवासाचा डिजिटल रेकॉर्ड तयार केल्यास, स्वयंपाकघरातील अन्न सुरक्षेची काळजी घेणे, अन्नाचे स्त्रोत, कापणीच्या तारखा, वाहतूक पद्धती आणि साठवण परिस्थिती यांसारखी महत्त्वाची माहिती शोधणे शक्य होऊ शकेल.

सुविधेत कठोर सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे देखील लागू करण्यात आली आहेत. क्षेत्रांचे विभाजन करणे आणि पुरवठा व अन्नाचे योग्य व्यवस्थापन केले जाण्याची खात्री करण्यासाठी कलर कोडेड टप्पे वापरणे या गोष्टी केल्या गेल्या आहेत.

शाश्वततेचे डिझाइन

शाश्वततेबद्दल बोलताना सागर म्हणाले: “आम्ही भारतात सुविधा उभारण्याची घोषणा केली तेव्हा आम्ही इमारतीच्या डिझाइनमध्ये पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींचा विचार केला आणि आमचे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी ऊर्जा कार्यक्षमता, जलसंवर्धन, इनडोअर एअर क्वालिटी अशा अनेक शाश्वत उपक्रमांना सुरूवात केली.”

“आमची सुविधा रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि एडव्हान्स्ड वॉटर रिसायकलिंग सिस्टिम वापरते. त्यामुळे भूजलावरील अवलंबित्व ५० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. आम्ही आमच्या कूलिंग सिस्टिमसाठी अमोनिया या इतर प्रकारच्या रेफ्रिजरंटपेक्षा पर्यावरणास अनुकूल असलेल्या नैसर्गिक रेफ्रिजरंटचा वापर केला.”

“आमच्या प्लॅनमध्ये विजेच्या आवश्यकतेच्या एक पंचमाश विजेची निर्मिती करण्यासाठी गच्चीवर सोलर पॅनल लोडसह सुसज्ज करण्याचाही समावेश आहे. आम्ही ओल्या कचरा निर्जलीकरण मशीनद्वारे कचरा हाताळणी आणि खर्च कमी करण्याचा विचार करत आहोत,” असे सागर म्हणाले.

नोकरदार पालकांसाठी डेकेअर

सुविधेच्या पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी कंपनीने आजपर्यंत २३० कर्मचारी नेमले आहेत, त्यापैकी बहुतेक आसपासच्या परिसरातील आणि ५० टक्क्यांहून अधिक महिला आहेत. कंपनीतील तरूण कुटुंबांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यासाठी, एसएफएआयने नोकदार पालकांना आणि विशेषतः मातांना पुन्हा कामावर आणण्यासाठी एक डे केअर सुविधा तयार केली आहे. या डे केअर सुविधेत मातांना आपल्या नवजात बालकांना स्तनपानाची आणि त्यांच्याशी नाते घट्ट करण्यासाठी वेगळी सुविधा आहे.

“आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची कदर करतो आणि त्यांनी त्यांचे सर्वोत्तम कार्य करावे अशी आमची इच्छा आहे आणि आमचा विश्वास आहे की हा फायदा त्यांना काम-जीवन संतुलन साधण्यात, त्यांची उत्पादकता आणि कामातील त्यांचा सहभाग वाढवण्यात मदत करेल,” सागर म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments