Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedकाढणीपश्चात प्रक्रिया युनिट स्थापनेसाठी २० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

काढणीपश्चात प्रक्रिया युनिट स्थापनेसाठी २० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. 4 (जिमाका, वृत्तसेवा) : कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनास चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने काढणीपश्चात पायाभूत सुविधा घटकांतर्गत प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट स्थापनेसाठी 20 जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

या योजनेअंतर्गत प्रक्रिया युनिटसाठी आवश्यक यंत्रसामग्री, उपकरणे तसेच इमारत, गोदाम व साठवण सुविधा उभारणीसाठी प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल २५ लाख रुपये, यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे.

 

शेतकरी उत्पादक संस्था, क्लस्टर स्तर महासंघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, वैयक्तिक शेतकरी तसेच नोंदणीकृत इतर उपक्रम अर्जास पात्र आहेत. गट लाभार्थी संस्था किमान दोन वर्षे नोंदणीकृत व कार्यरत असणे आवश्यक असून, प्रकल्प खर्चातील किमान १५ टक्के रक्कम लाभार्थ्यांनी उभारणे आवश्यक आहे. वैयक्तिक लाभार्थ्यांचे वय किमान २१ वर्षे असावे व एका कुटुंबातील केवळ एका व्यक्तीस अर्थसहाय्य दिले जाईल. अनुसूचित जाती-जमाती, महिला व डोंगराळ क्षेत्रातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

 

इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह २० जून २०२५ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

 

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments