Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली* 

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली* 

 

 

*राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले*

*– उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*

 

पुणे, दि. 4 : ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “अनंतराव थोपटे यांनी दीर्घकाळ भोर मतदारसंघाचे प्रभावी नेतृत्व केले. सहा वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. राज्य मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी ग्रामीण विकास, शेती, पायाभूत सुविधा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने कार्य केले. त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी लोकसंग्रह, साधेपणा आणि जनसेवा ही मूल्ये जपली.

 

ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे व्यक्तिमत्त्व हे संयमी, सर्वसमावेशक आणि लोकहिताला प्राधान्य देणारे होते. विविध राजकीय पक्षांतील नेत्यांशी त्यांनी जपलेले स्नेहसंबंध आणि राजकारणातील सभ्य परंपरा कायम स्मरणात राहतील.

त्यांच्या निधनाने केवळ भोर तालुक्याचेच नव्हे, तर पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. थोपटे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना करते, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

****

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments