पुणे,5 जून 2026 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) तर्फे ह्युंदाई इनोव्हेशन चॅलेंज 2026 ची घोषणा करण्यात आली असून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी स्टार्टअप्सकडून अर्ज मागवले आहेत.हे इनोव्हेशन चॅलेंज सहा महिन्याचा उपक्रम आहे. याचा उद्देश इलेक्ट्रिफिकेशन, नवीन गतीशीलता,कनेक्टिव्हिटी,एडीएएस प्रणाली,एआय आधारित साधने आणि पुढच्या पिढीतील वाहन तंत्रज्ञान या क्षेत्रात अत्याधुनिक उपाययोजना विकसित करणाऱ्या स्टार्टअप्सबरोबर भागीदारी करणे हे आहे.ग्लोबल स्टार्टअप कन्सल्टींग आणि ॲक्सिलरेटर प्लॅटफॉर्म असलेल्या लिंक इनोव्हेशन तर्फे व्यवस्थापित संकेतस्थळाच्या माध्यमातून स्टार्टअप्स जून 2026 अखेरपर्यंत आपले अर्ज पाठवू शकतात.


