पुणे, दि.५: भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ नुसार आंबेगाव तालुक्यात मंचर येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ११ जून २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत मंचर पोलीस स्टेशन हद्दीत शहरातील पांडवकालीन बारव शेजारील दर्गा व कब्रस्तान सह सभोवतालच्या ५० चौ. मी. परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याबाबतचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गजानन पाटील यांनी जारी केले आहे.
या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ मधील तरतूदी व प्रचलित काद्यान्वये शिक्षेस पात्र राहिल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


