Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिक्षक धनंजय ठोके यांना 'नव्वदोत्तरी दलित नाटक व दलित रंगभूमी' या विषयात...

शिक्षक धनंजय ठोके यांना ‘नव्वदोत्तरी दलित नाटक व दलित रंगभूमी’ या विषयात पीएचडी पदवी प्रदान!

 

 

पिंपरी, ६ जून २०२६ (प्रतिनिधी): जय हिंद ज्युनियर कॉलेजचे शिक्षक प्रा. धनंजय शिवचंद ठोके यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मराठी विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी ‘नव्वदोत्तरी दलित नाटक व दलित रंगभूमी’ या अत्यंत अभ्यासपूर्ण विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक व सामाजिक स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

 

प्रा. धनंजय ठोके यांचे उच्च शिक्षण (एम.ए., बी.एड., एम.एड., एम.फिल. आणि नेट) मराठी विषयातून झाले आहे. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातून त्यांनी आपले संशोधन कार्य पूर्ण केले. यासाठी त्यांना डॉ. संभाजी मलघे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.हा शोधप्रबंध पूर्ण करण्यासाठी त्यांना तब्बल १० वर्षे लागली. पीएचडी प्रवेशानंतर काही महिन्यांतच संपूर्ण जगावर कोव्हिडचे संकट ओढवले. या अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण काळात संशोधन पुढे सुरू ठेवणे हे मोठे आव्हान होते. मात्र, ग्रंथालयांची मदत, मार्गदर्शकांचे सहकार्य आणि मित्रांची साथ यांच्या बळावर त्यांनी या संकटावर मात करत आपले संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण केले.

 

प्रा. ठोके यांनी एका बाजूला जय हिंद कॉलेजमध्ये अध्यापनाचे कर्तव्य बजावत असताना, दुसरीकडे संशोधनाचा दर्जा कुठेही कमी होऊ दिला नाही. कामाच्या ठिकाणी काम आणि अभ्यासाच्या ठिकाणी अभ्यास अशी पक्की मध्यरेषा आखून त्यांनी हे शिवधनुष्य पेलले. यादरम्यान आलेला कामाचा ताण आणि धावपळ या सर्वांचा स्वीकार करत त्यांनी संशोधनाचा टप्पा यशस्वीपणे गाठला. भविष्यात या शोधप्रबंधावर आधारित पुस्तक लिहिण्याचा मानसही त्यांनी मिडिया सोबत बोलून दाखवला आहे.

 

प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असून आपल्या या यशाचे श्रेय प्रा. धनंजय ठोके यांनी त्यांचे मार्गदर्शक डॉ. संभाजी मलघे, सहकारी शिक्षक, मित्र परिवार आणि कुटुंबाला दिले आहे. विशेषतः वडील शिवचंद ठोके, आई छाया ठोके, भाऊ प्रवीण, वहिनी प्रतिभा, बहीण स्वाती शिरसाट, वैशाली गायकवाड, लिंबाजी गायकवाड, प्रभावती बनसोडे, तसेच सासरे डॉ. शांताराम वाघ, सासू पद्मा वाघ आणि मेहुणे आनंद वाघ यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. तसेच पत्नी अंतिमा आणि मुलगा अधिराज यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच हे संशोधन कार्य पूर्णत्वास नेऊ शकलो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments